HONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील
स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या शब्दातील अचूक स्पेलिंग ओळखून दाखवा.
Optical illusion : सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी पहायला मिळतात. यामध्ये व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी असतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल होता. ज्यासाठी डोक्याचा देखील वापर करावा लागत आहे. असाचएक फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. HONEY या शब्दांच्या गर्दीत MONEY हा शब्द शोधायचा आहे. ज्यांची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी तल्लख आहे असे लोक अवघ्या काही वेळात अचूक शब्द शोधून काढतात.
काही गोष्टी अगदी सोप्या दिसतात. मात्र, याच गोष्टी डोक्यात भ्रम निर्माण करतात. या चित्रांनाच Optical illusion असे म्हंटले जाते. अशा प्रकारची कोडी सोडवताना बुद्धीचा कस लागतो. डोकं चालवावं लागत. असचं एक कोडे सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यानंतर काहीच समजत नाही. मात्र, बारकाईने निरीक्षण केले असता अगदी सहज हे कोडं सोडवता येवू शकतो. अनेकांनी अवघ्या काही सेकंदात हे कोडं सोडवलं आहे.
HONEY या शब्दांच्या गर्दीत शोधायचं आहे MONEY
HONEY या शब्दांच्या गर्दीत MONEY हा शब्द शोधण्याचे चॅलेंज आहे. पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर चॅलेंज थोडं अवघड वाटते. पण, हे चॅलेंज सोडवण्याचा प्रयत्न केला तर अगदी सहज हे चॅलेंज पूरण करता येते. या चित्रात सर्वत्र इंग्रजीत HONEY लिहिलेले आहे, पण नीट लक्ष दिल्यास काही ठिकाणी इंग्रजीत MONEY लिहिलेले दिसेल. चित्रात लपलेला हाच MONEY शब्द शोधण्याचे चॅलेंज आहे.
10 सेकंदात ओळखायचा आहे अचूक शब्द
हे चॅलेंज 10 सेकंदात पूर्ण करायचे आहे. HONEY या शब्दांच्या गर्दीत MONEY हा शब्द फक्त 10 सेकंदात ओळखायचा आहे अनेकांनी 10 सेकंदापेक्षा कमी वेळात हे चॅलेंज पूर्ण केले आहे. डोकं चालवा. कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला उत्तर सापडत नसेल तर याचे उत्तर आम्ही देत आहोत.
मेंदूचा व्यायाम
Optical illusion फोटो हे एक प्रकारे मेंदूचा व्यायाम आहे. ही कोडी सोडवताना. बुद्धीचा वापर करावा लागतो. यामुळे मेंदू तल्लख होतो. तर, नजर देखील तीक्ष्ण होते. वेगवेगळ्या प्रकारेच Optical illusion असलेले फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात. अनेक जण या चॅलेंजमध्ये सहभागी होतात.