मुंबई : आता ही सर्वात महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. फेब्रुवारी महिना संपत आला आहे. 28 फेब्रुवारीपूर्वी हे काम पूर्ण केलं नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करणं आवश्यक आहे. जर हे काम केलं नसेल तर आजच करून टाका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पेन्शनधारकांना आपलं जीवन प्रमाणपत्र  (Jeevan Pramaan Patra) सादर करावं लागणार आहे. हे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करावं लागलं. हे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी आहे. जर हे प्रमाणपत्र मुदतीपूर्वी सादर केलं नाही तर पेन्शनधारकांना पैसे मिळू शकणार नाहीत. त्यांचं पेन्शन थांबवण्यात येणार आहे. 


हे प्रमाणपत्र जर अजूनही सादर केलं नसेल तर येत्या 24 तासांत ते सादर करणं अत्यावश्यक आहे. अन्यथा मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. लाइफ सर्टिफिकेट जमा केल्यानंतर तुमचं पेन्शन सुरू राहणार आहे. 


केंद्र सरकारनं पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची अंतिम मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2022 केली होती. आता अजूनतरी ही मुदत वाढवण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रमाणपत्र तातडीनं जमा करा. यापूर्वी ही प्रमाणपत्र जमा करण्याची तारीख 30 नोव्हेंबर होती. कोरोनामुळे ती मुदत वाढवण्यात आली. आता जाणून घेऊया ते तुम्ही कसं घरबसल्या जमा करू शकता.  


पेन्शनधारकांना jeevanpramaan.gov.in या पोर्टलवर जाऊन भेट द्यायची आहे. तिथे लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांजा जीवन प्रमाण App डाऊनलोड करायचं आहे. त्यानंतर UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाइस असायला हवं. तुम्ही स्मार्टफोनद्वारे ईमेल आयडी आणि इतर डिटेल्स भरू शकता. 


त्यानंतर तुम्ही हे सर्टिफिकेट बँकेत ऑनलाइन जमा करू शकता. यामध्ये 12 बँकांचा समावेश आहे. तुमचं खातं यापैकी कोणत्या बँकेत आहे यावर अनेक गोष्टी डिपेन्ड आहे. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुम्ही 12 बँकांमध्ये जमा करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नेशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब अॅण्ड सिंध बँक, यूको बँक अशा बँकांचा यामध्ये समावेश आहे. 


30 नोव्हेंबर पर्यंत आपल्या बँकेच्या शाखेत (Pensioners Life Certificate) जमा करण्याची मुदत होती. ही मुदत वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. दरवर्षी पेन्शनधारकांना हे प्रमाणपत्र जमा करणं बंधनकारक आहे. ज्यामुळे पेन्शनधारक व्यक्तीला त्याचा योग्य लाभ मिळेल. त्याच्या पश्चात इतर कोणी याचा फायदा घेणार नाही. यासाठी ही सेवा केंद्र सरकारनं सुरू केली आहे.