मुंबई : लोकं सध्या रोख रक्कम काढण्यासाठी  ATM चा वापर करतात. ATM च्या मदतीने तुम्ही कधीही कुठे ही, पैसे काढू शकता, फक्त त्यासाठी दिवसाची लिमिट 20 हजार रुपये आहे. पंरतु आता तुमच्या ATM मधून वारंवार पैसे काढण्यावर ब्रेक लागणार आहे.  कारणा आता एटीएममधून वारंवार रोख रक्कम काढल्यास त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता त्याच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. बँकांवरचा वाढता भार पाहता आरबीआयने एटीएम व्यवहारासाठी शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात 5 वेळा मोफत व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे, तर मेट्रो शहरांमध्ये अन्य बँकेच्या एटीएममधून 3 वेळा पैसे काढण्यासाठी विनामूल्य सेवा देण्यात आली आहे. त्याच बरोबर नॉन मेट्रो व्यवहार अन्य बँकेच्या एटीएममधून केल्यास ते 5 वेळा विनामूल्य आहेत. या मोफत व्यवहाराच्या मर्यादेमध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहार समाविष्ट आहेत.


या मर्यादेनंतर, ग्राहक एटीएममधून कोणताही व्यवहार करत असल्यास, त्याला प्रति व्यवहार 21 रुपये द्यावे लागतील, जे आतापर्यंत 20 रुपये होते. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही फी ग्राहकांवर 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.


त्याशिवाय एटीएम बसविणे आणि देखभाल दुरुस्तीवरील खर्च लक्षात घेता. आरबीआयने सुमारे 9 वर्षानंतर इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी इंटरचेंज फी 15 रुपयांपासून वाढवून 17 रुपये केली आहे. तर आर्थिक व्यवहाराची फी 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढवली आहे. हे नवीन शुल्क 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होतील.


इंटरचेंज फी काय आहेत?


जेव्हा एकाद्या बँकेचा ग्राहक कोणत्याही दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून व्यवहार करतो, तेव्हा त्यांची बँक, दुसऱ्या बँकेच्या एटीएम ऑपरेटरला शुल्क भरते ज्याला इंटरचेंज फी म्हणतात.


एटीएम ऑपरेटर बराच काळ इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी करीत होते, परंतु बँकांना ते मान्य नव्हते. पंरतु आता ही फी वाढली गेली आहे, त्यामुळे याचे ओझे ग्राहकांवर पडणार आहे.


कोणत्या गोष्टी ट्रांजॅक्शनमध्ये धरले जाणार नाही? 


जर तुम्ही वापरलेला एटीएम खराब असेल, तर त्याला ट्रांजॅक्शनमध्ये धरले जाणार नाही.
तर ATMमध्ये कॅश नसेल तर त्या व्यवहाराला ट्रांजॅक्शनमध्ये धरले जाणार नाही.
चुकीचा पिन टाकला तरी, त्याला देखील ट्रांजॅक्शनमध्ये मोजले जाणार नाही.


कोणत्या गोष्टी ट्रांजॅक्शनमध्ये मोजले जाणार? 


तुमच्या अकाउंटमधील बॅलेंस चेक करायला ट्रांजॅक्शनमध्ये धरले जाईल.
फंड ट्रांसफर, टॅक्स पेमेंट, फ्री ट्रांजॅक्शन लिमिटमध्ये धरले जाणार नाही.
एटीएममधून चेक बुकसाठी अर्ज करणे देखील विनामूल्य मर्यादेमध्ये असणार नाही.