नवी दिल्ली : तुम्हाला तातडीचं कर्ज हवं असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या हक्काच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे मदत मागता... पण, आता हेच कर्ज मिळवण्यासाठी एक मोबाईल अॅप तुमचा मित्र बनलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोबाईल अॅपच्या साहाय्यानं तुम्हाला केवळ काही मिनिटांत कर्ज मिळू शकतं. स्टार्टअप कंपनी 'मनीटॅप'नं मोबाईल अॅपच्या साहाय्यानं पाच लाख रुपयांपर्यंतच कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय. यावर्षीच्या शेवटपर्यंत कंपनीनं एकूण मिळून ३०० करोड रुपयांचं उपलब्ध करून देण्याचं ध्येय समोर ठेवलंय. कंपनीचा सह-संस्थापक अनुज ककर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी छोट्या शहरांवर आपलं लक्ष केंद्रीत करत आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, मनीटॅपचं मोबाईल अॅप हिंदी, तेलुगु, तमिळ, मराठी, गुजराती आणि कन्नड भाषेतही उपलब्ध होणार आहे. कंपनी सध्या १४ शहरांमध्ये सेवा देत आहे. या वर्षीच्या शेवटार्यंत जवळपास ५० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध असेल. 


'मनीटॅप'च्या साहाय्यानं ग्राहकांना केवळ काही मिनिटांत कर्ज मंजूर केलं जातं. पुढच्या तीन वर्षांच्या काळात आपल्या सुविधेनुसार तुम्हाला हे कर्ज फेडता येऊ शकतं. कंपनीनं या सुविधेसाठी सिबिल आणि बँकांशी हातमिळवणी केलीय. हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही ग्राहकाला जामिनाची गरज लागणार नाही.