Monkey Cap Online Sale: ऑनलाइन शॉपिंगच्या (Online Shopping) जमान्यामध्ये अनेकदा सेल किंवा विशेष ऑफर्सबरोबर (Online Offers) सामान्यपणे अशा प्लॅटफॉर्मवरील वस्तूंच्या किंमतींमध्ये चढ उतार होताना दिसतो. अनेकदा वस्तूंच्या किंमती वाढवून त्या ऑफर्सच्या नावाखाली कमी केल्या जातात असेही आरोप केले जातात. मात्र सेल (Online Sale) किंवा विशेष ऑफर्सअंतर्गत अनेकदा या वस्तू कमालीच्या कमी दरात विकत घेण्याची संधी ग्राहकांना असते. मात्र त्या उलट अनेकदा येथील काही वस्तूंची किंमत पाहून 'असं काय आहे यात?' असा प्रश्न विचारावा वाटतो इथपर्यंत त्यांच्या किंमती असतात. अशाच एका कानटोपीची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. या कानटोपीची (Monkey Cap Price) किंमत पाहून अनेकांना धक्का बसला असून काहींनी तर थेट या वेबसाईटच्या प्रायझिंगवरुन संताप व्यक्त केला आहे.


ऑफरनंतरची किंमत पाहिली का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजीमध्ये मंकी कॅप (Monkey Cap) नावाने ओळखली जाणारी कानटोपी एवढ्या महाग विकली जात आहे की तिची किंमत चुकून एवढी लावली आहे की काय अशी शंका ग्राहकांकडून उपस्थित केली जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लक्झरी ब्रॅण्ड डग्लस अॅण्ड गबानाच्या वेबसाईटवर ही कानटोपी विक्रीसाठी उपलब्ध आहे. या टोपीवर घसघशीत सूट देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. सूट दिल्यानंतर या टोपीची किंमत 31 हजार 990 रुपये इतकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 40 हजार रुपये इतकी आहे. बसला ना तुम्हाला पण धक्का?


स्क्रीनशॉट व्हायरल


मंकी कॅप नावाने विकल्या जाणाऱ्या कानटोपीचं या लक्झरी ब्रॅण्डनं बारसंही केलं आहे. या वेबसाईटवर कानटोपी 'मास्क कॅप' नावाने विकली जात आहे. खरं तर ही कानटोपीसारखीच दिसत असून आजही भारतामध्ये आणि खास करुन ग्रामीण भागांमध्ये या टोप्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. तारक मेहता उल्टा चष्मा मालिकेमधील बाबूजी या लोकप्रिय पात्राने अनेकदा ही टोपी घातलेली पहायला मिळालं आहे. मात्र आता ही सेलमधील मंकी कॅप सध्या चर्चेत आहे. तुम्हीच पाहा हा स्क्रीनशॉट



एवढ्यात तर बाईक येईल


एका युझरने या महागड्या 'मास्क कॅप'च्या किंमतीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या टोपीची किंमत एवढी का आहे हे लोकांना न उलगडलेलं कोडं आहे. एका युझरने लहानपणापासून मफलर तोंडाला, कानाला, डोक झाकायला वापरताना फार अडचणी यायच्या मात्र वयस्कर व्यक्ती ही सारी कामं या एका टोपीच्या मदतीने करायची. अन्य एकाने ही टोपी वडील आणि आजोबांसाठी फॅशन सिम्बॉल होती, असं म्हटलं आहे. अन्य एकाने तर या एवढ्या पैशांमध्ये एखादी सेकेण्ड हॅण्ड बाईक विकत येईल अशी तुलना करणारी प्रतिक्रिया दिली आहे.