Wild animals : आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना पाहतो. अनेकदा हे व्हिडिओ मजेदार असतात. हे व्हिडिओ पाहून अनेकांचे मनोरंजन देखील होते. विशेषतः प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. वाघाचे (Tiger) आणि माकडाचे (Monkey) अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात पण या व्हिडिओत काही विशेष आहे. या व्हिडिओतून डोक्यासमोर ताकदीचे काहीही चालत नाही, ही शिकवण आपल्याला मिळते. (monkey fought the even the king of the jungle was fooled viral video nz)


हे ही वाचा - श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या 



अद्भुत अक्कल वापरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत वाघ झाडावर चढून माकडाला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  मात्र माकडाने त्याच्या हूशारीने वाघाचा पराभव केला. जेव्हा वाघा समोर माकडाचा सामना होतो तेव्हा माकड आपली अद्भुत अक्कल वापरुन वाघाला माघार घ्यायला लावतो.


हे ही वाचा - Aishwaraya rai आणि अभिषेक वेगळे होणार? नक्की काय घडलं... Video पाहून तुम्हीच ठरवा



माकडाची शिकार करताना वाघाला अपयश


तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की वाघ माकडाची शिकार करण्यासाठी जेव्हा झाडावर चढतो तेव्हा माकड झाडाचे मजबूत खोडं सोडून एका पातळ फांदीला लटकतो, आणि अशातच वाघाचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. मग वाघ न विचार करता माकड ज्या पातळ फांदीला लटकलेला आहे त्यावर उडी मारतो अशाने वाघाच्या वजनाने फांदी तुटते आणि वाघ खाली कोसळतो तर माकड तिथून आपला जीव घेऊन पळतो. 


 



 


हे ही वाचा - Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच



अवनीश शरण ट्विटरवर शेअर


हा व्हायरल  व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक माकडाच्या हूशारीचे कौतुक करत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘वाघाला उपाशी राहावे लागले, माकडाला नवे जीवन मिळाले..! त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप हसू आले. हा व्हिडिओ एक लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 8575 लोकांनी या व्हिडिओवर लाईक कोले आहे.