मुंबई:  तुम्ही गँगवारबद्दल ऐकलं असेल आणि गँगवार पाहिलंही असेल. माकडांची काय दहशत असू शकते याचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येईल. कुठे आणि खट्याळ माकडं कधी कुणाच्या हातातून खाऊ हिसकावतात तर कधी वस्तूंवर डल्ला मारतात. त्यांची कुणी खोडी काढली तर त्याला हैराण करून सोडतात. पण इथं  तर माकडांचा अक्षरश: धुडगूस सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही माकडं एमकेकांवर तुटुन पडली आहेत. माकडांच्या गँगनं सारा रस्ताच रोखून धरला आहे. त्यांची दहशत पाहून रस्त्यावरून येणा-या जाणा-यांनी दूरच राहण्यात शहाणपण दाखवलं आहे. हा व्हिडिओ थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोपबुरा इथला आहे. इथं दरवर्षी शेकडो पर्यटक येतात. त्यांनी दिलेल्या खाद्यपदार्थांवरच या माकडांचं पोट भरतं. पण कोरोनामुळे इथं पर्यटकांना येण्यास बंदी आहे.



लॉकडाऊनमुळे स्थानिकांचा रोजगारही हिरावला गेला आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत माकडांची  आबाळ होऊ लागलीय. पोटातली आग जेव्हा डोक्यात जाते तेव्हा माणूसही पेटून उठतो ही तर मुकी जनावरं आहेत. माणसांप्रमाणे लॉकडाऊन जनावरांच्याही जिवावर  उठलाय, हेच यातून अधोरेखित होत आहे.