माकडाला ब्रेड आणि टॅब दिला...त्याने टॅब निवडला आणि ही करामत करून दाखवली
माकडानं ब्रेड खाणं सोडून टॅबसोबत केले असे माकडचाळे, हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल व्वा बेटे मौज करदी
सिंगापूर: दुकानातून दारू पळवून नेणारा माकड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. आता आणखी एका माकडाची चर्चा होत आहे. याआधी एका माकडाने मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर ताबा मिळवला होता. आता चक्क कॉलेजमध्ये घुसून धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. या माकडाला खायला दिलं तरीही त्याने आपला हेका काही केल्या सोडला नाही.
माणसांप्रमाणेच आता माकडालाही टेक्नोलजीवर प्रेम आल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. सिंगापूरच्या युनिव्हर्सिटी कॅप्समध्ये घुसून या माकडाने धुमाकूळ घातला. तिथे त्याला ब्रेड खायला दिला तरीही त्याने तो सोडून कागद आणि टॅब हातात घेतला. टॅब घेऊन तो खाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला असं टॅब तोंडात घातलेलं पाहून विद्यार्थी घाबरले. मात्र त्यांना हा काढून घेण्याचा प्रयत्न केला. माकड काही केल्या टॅब द्यायला तयार नव्हतं.
विद्यार्थी जेफने माकडाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तर माकडाला ब्रेड खायला दिल्याचंही दिसत आहे. मात्र माकडाने तो ब्रेड खाली टाकून दिला. माकड टॅबसोबत छेडछाड करण्यात व्यस्त झालं. माकडाच्या या करामती पाहून सर्वजण हैराण झाले.
या माकडाने ब्रेड आणि टॅब उचलून नेला आणि तो पळून गेला. जेव्हा त्या माकडाला हा टॅब खाता आला नाही तेव्हा त्याने थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिला. हा टॅब नवा कोरा होता. ज्याची माकडाने पुरती वाट लावली होती. भुकेलेल्या माकडाने नव्या टॅबची वाट लावली आहे.