मंकीपॉक्सचा धोका वाढला, `या` राज्यात सापडला आणखी एक रुग्ण
भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णांचा आकडा वाढला
मुंबई : देशात कोरोना आणि स्वाईन फ्लू, इबोला पाठोपाठ आता मंकीपॉक्सचं संकट वाढत आहे. देशात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण UAE मधून परतला होता. त्याची चाचणी झाल्यानंतर तो मंकीपॉक्सने संक्रमित असल्याची माहिती मिळाली.
केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा तर देशात तिसरा रुग्ण सापडला आहे. हा 35 वर्षांचा तरुण 6 जुलै रोजी UAE वरून भारतात परतला. त्याचे नमुने लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आहे. त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर तिरुवनंतपुरम इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आधीच भारतात स्वाईन फिव्हरचा धोका आहे. त्यासोबत स्वाईन फ्लू आणि कोरोना देखील आहेत. केरळमध्ये दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. त्यांनी अलर्ट जारी केला आहे.
मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे साधारणपणे 6 ते 13 दिवसात दिसू लागतात, परंतु ते 5 ते 21 दिवसांपर्यंत ते असू शकतात. ताप, तीव्र डोकेदुखी, सुजलेल्या लिम्फ नोड्स, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यासारखी लक्षणं यामध्ये आढळतात.
त्वचेचा त्रास सामान्यतः ताप आल्यानंतर 1 ते 3 दिवसांच्या आत सुरू होतो. पुरळ घशापेक्षा चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे प्रभावित करते.