Central govt On Monkeypox : जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या धोकादायक व्हायरस म्हणजेच मंकीपॉक्स (MonkeyPox) आता भारतात देखील आला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्याला विलिगीकरणात (Ioselation) ठेवण्यात आलं अन् चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता याच संशयीत व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीये. याबाबत आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) मोठी माहिती देखील दिलीये. भारतात मंकीपॉक्सचा धोका आहे का? यावर केंद्र सरकारने उत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका संशयित रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकन क्लेड 2 एमपॉक्स विषाणूच्या उपस्थितीची पुष्टी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलीये. हे प्रकरण जुलै 2022 नंतर भारतात नोंदवलेल्या पूर्वीच्या 30 प्रकरणांपैकी एक वेगळे प्रकरण आहे आणि सध्या मंकीपॉक्सच्या क्लेड 1 संदर्भ हा आरोग्य आणीबाणीचा (WHO ने अहवाल दिलेला) भाग नाही, असं देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. एमपॉक्स ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नाही, असं केंद्राने सांगितल्याने सर्व भारतीयांना सुटकेचा श्वास घेतला आहे.


एमपॉक्स विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला इतर कोणत्याही आजाराने ग्रासलेलं नाही. त्यामुळे त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलंय. जगातील 116 देशांमध्ये एमपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. 2022 मध्ये देखील डब्लूएचओने याबद्दल इमर्जन्सी जाहीर केली होती. या व्हायरसमुळे काँगेमध्ये आतापर्यंत 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली होती. तर मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणं तरुण पुरुषांमध्ये आढळली आहेत, ज्यांचं सरासरी वय 34 वर्षे आहे.


दरम्यान, WHO च्या अहवालानुसार मंकीपॉक्सचा उगम आफ्रिकन देश कांगोमधून झाला आहे. आफ्रिकेतील दहा देशांना याचा गंभीर फटका बसलाय. मंकीपॉक्सच्या वेगवेगळ्या प्रादुर्भावांमध्ये मृत्यूदर भिन्न आहेत. त्यामुळे भारतात मंकीपॉक्स किती घातक ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जगभरात मंकीपॉक्सच्या केसेसचा वेगाने प्रसार होतोय. त्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदरं आणि सर्व राज्यांना अलर्ट जारी केलाय.


कोणती काळजी घ्यावी?


ज्या लोकांचं पुरळ मंकीपॉक्ससारखं दिसतं, त्यांच्या जवळ जाणं टाळावं.


संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले कपडे तसंच इतर गोष्टींना स्पर्श करु नये.


साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत.


लक्षणे दिसल्यास त्वरीत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.