मुंबई : कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी आता मंकीपॉक्सने चिेंता वाढवल्या आहेत. कोरोना हळूहळू भारतात पसरला आणि हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. पण आता मंकीपॉक्समुळे जीव देखील जायला लागला आहे. भारतात मंकीपॉक्स झालेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (First death of Monkeypox virus)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात मंकीपॉक्समुळे (Monkeypox) झालेल्या पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. केरळमध्ये मरण पावलेल्या 22 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्स विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ही व्यक्ती यूएईहून परतली होती.


त्या व्यक्तीचा मृत्यू मंकीपॉक्सच्या विषाणूमुळे झाला की नाही हे शोधण्यासाठी नमुना एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आला. तेथे सकारात्मक परिणाम आले आहेत. या व्यक्तीचा केरळमधील त्रिशूर येथे 30 जुलै रोजी मृत्यू झाला.


मंकीपॉक्सच्या वाढत्या चिंतेमुळे केंद्र सरकारही आता योग्य ती खबरदारी घेत आहे. केंद्राने एक टास्क फोर्सही तयार केला आहे. डॉ व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या नेतृत्वात ही टीम काम करत आहेत.