मुंबई : Monsoon expected in Kerala on May 27 : मान्सून सक्रीय झाला असताना त्याच्या वाटचालीला ब्रेक लागला आहे. 23 तारखेपासून मान्सूनच्या प्रगतीला 48 तासांचा ब्रेक लागला आहे. तो आता श्रीलंकेच्या वेशीवरच अडकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

48 तासात मान्सून पुढे सरकरण्यास पोषक हवामान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पण त्यानंतर मान्सून प्रगतीबाबत हवामान विभागाच्या संकेतस्थळावर काल म्हणजे 25 तारखेला संध्याकाळी अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार मान्सून दोन दिवसानंतर पुन्हा सक्रीय होईल. हवामान विभागाने अपडेट केलेल्या नकाशात मान्सून 23 तारखेला जिथे होता, तिथेच असल्याचं दिसत आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून पुन्हा सक्रीय होईल आणि हंगामी पाऊस सामान्य होण्याची शक्यता आहे.  पाऊस सामान्य  99 टक्के अपेक्षित आहे. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सूनची सुरुवात अपेक्षित आहे. पुढील 5 दिवसांत, कोकण आणि गोवा प्रदेश आणि राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तसेच हलका पाऊस पडेल, असे आयएमडी मुंबईचे प्रमुख जयंता सरकार यांनी एएनआयला सांगितले.


नैऋत्य मॉन्सून पुढील 48 तासांत नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन परिसर, दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे, हवामान विभागाने सांगितले.