उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा, ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार
उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. हवामान विभागाने दिसाला देणारी बातमी दिलेय.
नवी दिल्ली : तापमानाचा पारा मे महिन्यात ४५ डिग्रीच्यावर पोहोचलाय. उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. हवामान विभागाने दिसाला देणारी बातमी दिलेय. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याआधीच पावसाला सुरुवात झालेय. तसेच याशिवाय बंगालच्या खाडीत, दक्षिण अंदमान आणि निकोबार महाद्वीपच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस सुरु झालाय. केरळ, मेघालय या भागातही पाऊस सुरु झालाय. या पावसाच्या हालचालीमुळे ४ दिवसात केरळमध्ये पाऊस पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.
जूनच्या आधी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून येण्यास आता जास्त वेळ लागणार नाही. जूनच्या आधी देशात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटलेय, सुरुवातीला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात मान्सूनसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसात मान्सून अधिक सक्रिय होईल. या दरम्यान पश्चिम मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ 'मेकुनू'मुळे येण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये जोरदार पाऊस
केरळात पाऊस जरी पाऊस जूनआधी दाखल होत असला तरी संपूर्ण देशात अन्य भागात कसा पाऊस पडेल याचा अंदाज बांधणे कठिण आहे. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील एक्कू संस्थेने म्हटलेय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला आणि जोरदार पाऊस पडेल.