पणजी : मान्सून अखेर गोव्याच्या वेशीवर धडकलाय. अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळं पुढच्या २४ ते ४८ तासांत मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवतलाय. मान्सूनचं आगेकूच असंच सुरू राहिलं तर १३ जूनपूर्वीच मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याखेरीज आणखी एक गुडन्यूज हवामान खात्यानं दिलीये. यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. जुलैमध्ये पहिल्या अंदाजामध्ये  96 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत करण्यात आलं होतं. त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. एकंदरीत यंदाही देशाच्या सर्व भागांमध्ये मान्सूनचं प्रमाण चांगलं असेल, अशी शक्यता आहे.