Monsoon Update in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; तारखेसोबत पाहून घ्या मान्सूनचं वेळापत्रक
Monsoon Update in Maharashtra : मान्सूनची वाटचाल सुरु झाल्याची पहिली बातमी आली, त्या क्षणापासून अनेकांनाच हा वार्षिक पाहुणा महाराष्ट्राच्या वेशीवर केव्हा येणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
Monsoon Update in Maharashtra : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच तापमानानं चांगलेच रंग दाखवण्यास सुरुवात केली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा इतका वाढला की, प्रशासनाकडूनही नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं. ही परिस्थिती असतानाच कोल्हापुरात जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त समोर आलं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली मात्र उष्णतेनं त्रासलेल्या कोल्हापूरवासियांना काहीअंशी दिलासाही मिळाला.
तिथे कोल्हापुरात पाऊस बरसला असताना येत्या दिवसांत हा उकाडा बऱ्याच अंशी कमी होणार आहे. कारण, आता पावसाच्या दिवसांना सुरुवात होणार आहे. त्याहूनही बळीराजा सुखावणार आहे ही महत्त्वाची बाब.
हेसुद्धा वाचा : Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! 'व्लादिमीर'च्या शरीरावर...
अवकाळीचा मारा सहन केल्यानंतर आता मान्सूनच्या वाटचालीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी वर्गासाठी आणि सर्वसामान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. खरीपाचा हंगाम सुरु होण्याआधीच बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचं चित्र आहे. कारण, 19 मे पासून अंदमानात दाखल झालेला मान्सून आता पुढील वाटचाल वेगानं करताना दिसत आहे.
पाहून घ्या मान्सूनचं वेळापत्रक
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जूनपासून मान्सून केरळ, तामिळनाडूत दाखल होणार आहे. पुढे 4- 5 जूनपर्यंत तो आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ईशान्य भारतात बरसण्यास सुरुवात करेल महाराष्ट्रात मान्सून 10 जूनरोजी दाखल होईल. तर, याच दिवशी तो तेलंगणातही दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतात पुढे दर दिवसागणिक मान्सून टप्प्याटप्प्यानं पुढे सरकणार असून, 15 जूनपासून तो उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरातचं क्षेत्र व्यापेल. तिथे देशाच्या उत्तरेकडे म्हणजेच हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये यंदाचा मान्सून 20 जूनपर्यंत दाखल होईल. पहिल्या टप्प्यातील मान्सूनची ही वाटचाल 8 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.
पावसाचं वेळापत्रक कळलं असल्यामुळं आता देशाच्या विविध भागाती शेतकरी शेतीच्या कामांसाठी घाई करताना दिसतील. अवघ्या काही दिवसांनीच मान्सून महाराष्ट्रासह सबंध भारतावर चांगलीच पकड करेल आणि मग सर्वत्र हिरवळ आणि निसर्गाची एक नवी छटा पाहायला मिळेल.