नवी दिल्ली : नव्या वर्षात तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


किती कमी झाली किंमत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल कंपन्यांनी नव्या वर्षात गॅल सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडे चार रूपये कमी करण्यात आले आहेत. हे नवे दर जानेवारी २०१८ पासून लागू होती. सरकारने १४.२ किलोच्या गॅसची किंमत ८२२.५० रूपयांवरून ८१८.०० रूपये करण्यात आली आहे. त्याच्यप्रमाणे १९ किलो कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत १४५१ रूपयांहून १४४७ करण्यात आली आहे. म्हणजेच कमर्शिअल गॅल सिलेंडरमध्ये चार रूपयांची आणि घरगुती गॅस सिलेंडरमध्ये साडे चार रूपयांची कमी करण्यात आली आहे. 


सब्सिडी किती मिळणार?


जानेवारीमध्ये प्रति सिलेंडर कॅश सब्सिडी ३२० रूपये मिळणार आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ही रक्कम ३२५.६१ रूपये होती. आता सब्सिडीमध्ये ४.६१ रूपयांनी घट करण्यात आली आहे. यानुसार घरगुती गॅसच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा त्यांनाच घेता येईल जे सब्सिडी घेत नाहीत.