Morbi Bridge Collapse : गुजरातच्या मोरबी नदीवर (gujarat morbi bridge) असलेला पूल कोसळल्याने 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली होती. काही लोक पुलावर उडी मारून पुलाच्या केबलला लाथ मारतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत. काही लोकं पूलावर उभे राहून पूलाला हलवत असल्याचं देखील दिसत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शेकडो लोकं पुलावर उभी होती. त्यामुळे पूल पडल्याचा (morbi bridge collapse) प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञ सांगतात की, 'सामान्य पुलामध्ये नदीच्या मध्यभागी काँक्रीटचे खांब उभारले जातात. पण यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणजे झुलता पूल उभारला जातो. यामध्ये नदीच्या दुतर्फा टॉवर्स बनवून त्यात वॉकिंग डेक जोडण्यात आला आहे. असा पूल बांधण्यासाठी कमी वेळ आणि खर्च लागतो. त्यामुळे हा एक उत्तम पर्याय समजला जातो.


पुलावर एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं जमा झाली तर त्याठिकाणी लोड येतो. ज्यामुळे पूलाचा समतोल बिघडतो. ज्यामुळे स्पॅनवर भार पडतो. 1940 मध्ये अमेरिकेत टॅकोमा नैरोबी ब्रिजही बांधल्यानंतर काही दिवसांनी पडला होता. तपासात असे दिसून आले की जोरदार वाऱ्यामुळे प्रभावी लोड तयार झाला होता, ज्यामुळे पूल कोसळला होता.


कोणतीही रचना करताना त्याचा भार लक्षात घेऊनच केली जाते. त्यामुळे पुलावर भार नियंत्रित असला पाहिजे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अगदी मजबूत संरचनेतही भार सहन करण्याची क्षमता असते. पण अधिक भार पडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.


नूतनीकरणाच्या वेळी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. आवश्यकतेनुसार सर्व कनेक्शन बदलले जातात. काही वेळा नवीन केबल्सही टाकल्या जातात तर काही वेळा टॉवरची पुनर्रचनाही करता येते. नूतनीकरणात काही चूक झाली का, याचे उत्तर तपासाचा अहवाल आल्यानंतरच मिळेल.