मुंबई : भारतात वर्षाला १ लाख ५० हजारांहून अधिक लोक रस्ते अपघातात मरण पावतात. भारतातले रस्ते मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत. गेल्या ४ वर्षात रस्ते अपघातातल्या मृत्यूंची संख्या ६६ टक्क्यांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ दिवसाला तब्बल ५६ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यात सर्वाधिक मृत्यू पादचाऱ्यांचा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायकल चालक आणि दुचाकी स्वारांचाही यात समावेश होतो. मात्र सरकारी यंत्रणा केवळ सुरक्षा सप्ताह साजरे करण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. प्रत्यक्ष सुरक्षा कारवाई मात्र होताना दिसत नाही. याचंचं उत्तम उदाहरण पूर्व द्रुतगर्ती मार्गावर असलेल्या घोडागेट सिग्नल आणि सोप गेट सिग्नलवर पाहायला मिळत आहे.


सातत्याने इथे होत असलेल्या अपघातामुळे वाहतूक शाखेने उजवे वळण बंद करत सिग्नल काढून टाकण्याची घोषणा केली होती. पण वाहतूक विभागाने स्वतःच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखवत अपघात होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजना रद्द केल्या.