मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. आज देशभरातील १०,००० रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. ही बातमी दिसाला देणारी असली तरी सध्याच्या घडीला काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पण सर्वात जास्त रुग्ण मुंबई आणि पुण्यात आहे. त्यामुळे हे दोन शहर अद्यापही रेड झोनमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, देशभरात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी  दहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण सुखरूप बरे होऊन घरी परतले आहेत. शिवाय ज्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत ते  देखील बरे होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 



दरम्यान, देशभरात लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्यात आले आहे. 'लॉकडाऊन २' हा ३ मे पर्यंत वाढण्यात आला होता. पण आता तिसरा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. असे असले तरीही ऑरेंज आणि ग्रीन झोनला काही मुभा देण्यात आल्या आहेत. 


रेड झोनमध्ये कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त सर्व दुकाने खुली राहणार आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही दुकाने खुली राहतील. मॉल उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.