मुंबई : जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग  (Internet Banking) सुविधा नसेल, तर तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे चेक देण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टमसाठी (CTS)  सकारात्मक वेतन प्रणाली जाहीर केली होती. या नियमानुसार, बँका सर्व खातेधारकांसाठी 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी त्यांच्या इच्छेनुसार ही सुविधा लागू करू शकतात.


चेक नाकारला जाईल


आरबीआयच्या या नियमानुसार, चेक देण्यापूर्वी, तुम्हाला बँकेला याबद्दल माहिती द्यावी लागेल, अन्यथा तुमचा चेक स्वीकारला जाणार नाही. तथापि, या नियमांमुळे जेष्ठ नागरिक आहेत, जे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या सेवा वापरत नाहीत त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.


या बँकांनीकडून नियमांची अंमलबजावणी


अ‍ॅक्सिस बँकेसह (Axis Bank) काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त चेकसाठी PPS अनिवार्य केले आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना बँकेला नेट / मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन चेक तपशील द्यावा लागेल.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँकेने 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या चेकसाठी पॉजिटिव पे सिस्ट लागू केली आहे. हा नियम लागू करण्याचा हेतू ग्राहकांची सुरक्षा आहे. ही प्रणाली चेकद्वारे होणरी फसवणूक रोखेल.