रस्ते अपघातात भारताचे सर्वाधिक जवान दगावतात
जवळजवळ १ हजार ६०० जवान विविध अपघातात दरवर्षी दगावतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना देखील आपले एवढे जवान शहीद होत नाहीत.
मुंबई : युद्धभूमीत शहीद होण्यापेक्षाही कितीतरी पट जास्त, जवानांचा मृत्यू हा रस्ते अपघातात होतो. जवळजवळ १ हजार ६०० जवान विविध अपघातात दरवर्षी दगावतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना देखील आपले एवढे जवान शहीद होत नाहीत.
यापूर्वी देखील बीएसएफचा अहवाल
बीएसएफने यापूर्वी देखील एक अहवाल जाहीर केला होता, यात जवानांचा मृत्यू रस्ते अपघातात होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं निदर्शनास आणलं होतं. यातही अनेक जवान सुट्टीवर असताना, रस्ते अपघातात दगावण्याचं प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे ज्या जवानांची सेवा काही दोन-तीन वर्ष झाली आहे, अशा जवानांचं प्रमाण यात जास्त आहे.
३५० जवान रस्ते अपघातात दगावतात
टॉयने दिलेल्या वृत्तानुसार ३५० जवान रस्ते अपघातात दगावतात, तर १२० जवान हे आत्महत्या करतात, यात ट्रेनिंग दरम्यानचे मृत्यू, तसेच आरोग्याचे प्रश्न हे देखील जवानांच्या मृत्यूचं कारण आहे.
तर १२० जवान हे आत्महत्या करतात
आकडेवारीनुसार, आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाणही आपल्या देशात सर्वाधिक आहे. देशाला शिस्तीचं महत्त्व सांगणारे जवानही अशा गोष्टींना बळी पडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
तसेच जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात.