Toughest Courses in World: करिअरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण यासाठी आपण चांगले पगार देणारे क्षेत्र निवडणे आणि त्यासाठी चांगले क्षेत्र निवडणे गरजेचे असते. पण दहावी, बारावीनंतर असे कोणते कोर्स केले की भविष्यात आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल? हे अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसते. प्रत्येकाला सर्वात सोपा कोर्स करून चांगली नोकरी मिळवायची असते. सर्वसाधारणपणे आपल्या देशात असे घडते. पण असेही काही कोर्सेस आहेत ज्यांची गणना अत्यंत अवघड अभ्यासक्रमांमध्ये केली जाते. पण हे कोर्स केलात तर तुमची लाईफ सेट होते असे म्हटले जाते. कोणते आहेत हे कोर्स? याचे काय फायदे आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्सफर्ड रॉयल अकादमीने जगातील 10 सर्वात कठीण विषयांमधील पदवीची क्रमवारी जाहीर केली आहे. या अवघड विषयांमध्ये एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकावर आहे. एरोस्पेस इंजिनीअरिंग हा सर्वात कठीण कोर्स कोण करतो आणि तो केल्यानंतर कोणती नोकरी मिळते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 


इंजिनीअरिंगच्या मुख्य शाखांपैकी एअरोस्पेस एक शाखा आहे. यामध्ये विमान आणि अंतराळ यानाच्या बांधकामाशी संबंधित गोष्टी शिकवल्या जातात. या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्त्वांची सखोल माहिती आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा कोर्स कठीण मानला जातो. 


उत्कृष्ट वेतन पॅकेज


एरोस्पेस इंजिनीअरिंग कोर्समध्ये सर्व विमानांची रचना, बांधकाम आणि चाचणी शिकवली जाते. अशा गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे. या विषयाचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना पदवी मिळताच त्यांचे लाईफ सेट होते. कारण सुरुवातीला त्यांना लाखो-कोटींचे पगाराचे पॅकेज मिळते.


B.Tech इंजिनीअरिंगची सर्वात कठीण शाखा


एरोस्पेस अभियांत्रिकीमधील बी.टेक हा विमान आणि एरोस्पेसच्या विकासाशी संबंधित इंजिनीअरिंगच्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि एस्टोनॉटिकल  इंजिनीअरिंग हे एरोस्पेस इंजिनीअरिंगचे दोन प्रमुख भाग आहेत.