Most searched things online 2022: आपण सगळेच आपल्याला काही भूक लागली की स्विगी किंवा झॉमेटोसारखे (Swiggy, Zomato) पर्याय वापरतो. आपल्या काही शॉपिंग करायची असेल तेव्हा देखील आपण अशा सर्व पर्यायांना प्राधान्य देतो. हल्ली ग्रॉसरी म्हणजे किराणा मालाचे समानही ऑनलाईनद्वारे आपल्याला विकत घेता येते आणि त्यासाठी प्रत्यक्ष किराणादुकानाकडे जायचीही काही गरज नाही. सध्या ऑनलाईनद्वारे जग इतकं जवळ आलं आहे की आपल्याला इतर कुठे दुकानात जाऊन काही सर्च करण्यापेक्षा सरळ अशा ऑनलाईन साईट्सवरही (Online Search) सर्च करतो. पण तुम्हाला माहितीये का की आपल्या देशात लोकांनी स्विगीच्या इन्टामार्ट साईटवर काय काय सर्च केले आहे. याची यादी जर तुम्हाला कळली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (Most searched things of 2022 from underwear to bed and sofa this top 5 things people searched on swiggy instamart) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलनंतर आत स्विगीनंही आपल्या टॉप फाईव्ह सर्चचा खुलासा केला आहे. स्विगीवर अनेक गोष्टी आपण सर्वच जण ऑर्डर करत असतो. पण त्याहीपेक्षा आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट या सर्च इंजिन्सवर (Searching) मिळते की नाही हे तपासण्यासाठी आपण या सर्च इंजिनवर सर्वाधिक गोष्टी सर्च करत असतो. मग या सर्च करण्यामागची कारणं अनेक असतील. ऑर्डर करत वस्तू विकत घेणे आणि त्या ऑनलाईनवरून घरपोच डिलव्हरीतून आपल्याकडे पोहचणे यासाठी आपण स्विगीसारखा पर्याय वापरत असतो. कधी कधी आपण साध्या साध्या वस्तू या किराणा दुकानातून आणतो. त्यामुळे अनेक गोष्टी या ऑनलाईन साईट्सवर सर्च होत राहतात. 


तुम्हाला वाटेल की स्विगीवर काय जास्त सर्च झालं हे समजून मला काय फायदा होणार आहे. परंतु ही पाच नावं जर का तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेलच पण हसू फुटल्याशिवायही राहणार नाही. पण लोकांना किराणामाल, खाऊच्या गोष्टींपेक्षा काय काय सर्च करायला आवडलं हे जाणून घेऊया. 


हेही वाचा - SpiceJet: लय भारी! विमानात हटके अनाऊन्समेंट ऐकून प्रवासी झाले खूश, मजेदार Video झाला व्हायरल


2022 मध्ये लोकांनी काय काय केलं Search?



स्विगीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लोकांनी 2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या प्रोडक्टविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. फूड आणि आयटम डिलिव्हरी अॅपने य़ा 5 गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या लोकांनी अनेकदा वेळा शोधल्या आहेत. स्विगीवर 20,000 पेक्षा जास्त वेळा बेड आणि सोफा हा शब्द सर्च केला गेला त्यानंतर पेट्रोल आणि अंडरवेअर. एक गमतीदार शब्द सर्च झालेला पाहायला आणि तो म्हणजे मम्मी. हा शब्दही सर्च झाल्यानं लोकांनाही आश्चर्य वाटले. पेट्रोल 5981, अंडरवेअर 8810, मम्मी 7275, सोफा 20653 आणि बेड 23432 इतक्या वेळा शोधण्यात आले. 


मम्मी हा शब्द शोधला तेव्हा... 


जेव्हा मम्मी हा शब्द स्विगीवर सर्च झाला तेव्हा लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. बाळ्याच्या डापरचा ब्रॅण्ड शोधण्यासाठी लोकांनी मम्मी हा शब्द शोधला अशी फनी कमेंटही लोकांनी केली.