Mothers Day 2023: आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर... आपल्या मुलांसाठी सदैव कष्ट करणारी, त्यांची काळजी घेणारी, घरातील प्रत्येकासाठी ती सर्वांचा आधार असते. न थकता, न थांबता.. मुलांना धीर देणारी त्यांच्या पाठिंशी खंबीर उभी राहणारी आई असते. आपल्या बाळाला नऊ महिने गर्भात ठेऊन त्याची काळजी घेणारी आणि त्याला लहानाचं मोठं करणारी ती म्हणजे आई असते. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.. 'श्यामची आई' या चित्रपटातील हे गाणं ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात. आपल्या आईच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (Mother's Day) संपूर्ण जगभरात साजरा होता. या दिवशी कोणी आपल्या आईला छानसं गिफ्ट, कोणी आपल्या आईबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करतं तर कोणी आपल्या आईला घरकामात मदत करतं. पण मातृ दिन नेमका का आणि कधीपासून साजरा केला जातो हे तुम्हाला माहित आहे का?


कशी झाली मदर्स डे सुरुवात?
मदर्स डे सुरुवात करण्याचं श्रेय अमेरिकेतल्या अॅना एम जारविस या महिलेला जातं. अमेरिकेतल्या (America) वेस्ट वर्जिनियामध्ये अॅनाचा जन्म झाला. अॅनाची आई एका शाळेत शिक्षिका होती. अॅनाचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. एक दिवस आजारपणामुळे अॅनाच्या आईचं निधन झालं. त्यानंतर अॅनाने आपल्या आई प्रती प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा करायला सुरुवात केली. जिवंतपणीच आईचा सन्मान आणि तिच्या योगदानाच गौरव व्हावा अशी मोहिम अॅना सुरु केली. ही मोहिम प्रचंड गाजली आणि 8 मे 1914 रोजी अमेरिकेत पहिला मदर्स डे सजारा करण्यात आला. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची परंपराच सुरु झाली. 


काही जणांच्या मते ग्रीसमध्ये मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात पहिल्यांदा झाली. आपल्या आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी ग्रीसमधल्या नागरिकांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.


कधी आहे मदर्स डे? (When is Mother's Day in 2023)
यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 14 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. अमेरिका, भारत, न्यूझीलंड, कॅनडा आणि इतर काही मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. तर काही देशात मदर्स डे मार्च महिन्यात साजरा केला जातो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबाला देण्यासाठ वेळ नसतो. पण किमान या दिवशी आपल्या आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ नक्की द्या.
 
Disclaimer: वरील माहिती सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास या माहितीची पुष्टी करत नाही.