मुंबई : कोरोनाची दुसरी लाट जशी आली तशी वेगवेगळी प्रकरणं समोर आली. अनेर प्रकरणं हे डॉक्टरांसाठी धक्कादायक होती. आता वाराणसीच्या काशी हिंदू विद्यापीठातील सर सुंदर लाल रुग्णालयात अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कारण नवजात बाळ कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पण आई मात्र निगेटिव्ह आहे. हे एक वेगळेच प्रकरण आहे. ज्यामुळे डॉक्टर देखील हैराण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काशी हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदर लाल रुग्णालयात हे प्रकरण समोर आल्याने नवा प्रकार पाहायला मिळाला. 26 वर्षीय महिला गर्भवती आधीपासूनच बीएचयूमध्ये उपचार घेत होती आणि 25 मे रोजी प्रसूतीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यापूर्वी डॉक्टरांनी कोरोना टेस्ट केली.


कोरोना चाचणी केल्यानंतर महिला ही निगेटिव्ह आली. त्यानंतर 25 मे रोजी ऑपरेशन झाल्यानंतर बाळ जन्माला आलं. जन्मानंतर बाळाची टेस्ट करण्यात आली. जी कोरोना पॉझिटिव्ह आली. आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित आहे. पण या प्रकारामुळे डॉक्टर ही हैराण आहेत.


डॉक्टरांनी काय सांगितले?


या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीएचयू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रा.के.के.गुप्ता म्हणाले की, हे घडणे मोठी गोष्ट नाही, कारण आरटी-पीसीआरची एक्युरेसी 70 टक्के पर्यंत आहे. आता पुन्हा तपासणी केली जाईल आणि आवश्यक असल्यास मुलाची आणि आईची अँटीबॉडी चाचणीही पुन्हा घेण्यात येईल. यापूर्वी ती कोरोना पॉझिटिव्ह होती का हे जाणून घेणे यामुळे शक्य होईल.