Lesbian Partner Run Away With Friend: उत्तर प्रदेशमधील मैनापुरी येथील एक विवाहित महिला आपल्याच मैत्रिणीच्या प्रेमात पडली. आपल्या मैत्रीणीच्या प्रेमात ती एवढी वेडी झाली की ती आपल्या पतीला सोडून 3 मुलांसहीत या मैत्रीणीबरोबर पळून गेली. महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांनाही धक्का बसला.


...अन् ती मैत्रिणीबरोबर पळून गेली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैनापुरीमधील कुरावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हविलिया गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. येथे राहणाऱ्या संजीव नावाच्या व्यक्तीची पत्नी खुशबू हिची भेट 6 महिन्यांपूर्वी वंदना हिच्याशी झाली. वंदना अनेकदा खुशबूला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ लागले. या दोघी वंदनाच्या बाईकवरुन बसून भटंकतीलही जाऊ लागल्या. खुशबूचा पती मात्र तिने वंदनासोबत हिंडू फिरु नये असं सांगत तिला दम द्यायचा. वंदनाने घरी येणं, खुशबूला भेटणं, त्या दोघींनी फिरायला जाणं हे सारं संजीवला मान्य नव्हतं. वंदनाच्या मुद्द्यावरुन या दोघांमध्ये खटके उडू लागले. दरम्यान, 27 एप्रिल रोजी अचानक खुशबू आपल्या 3 मुलांसहीत बेपत्ता झाली. त्याचवेळी वंदनाही तिच्या घरातून पळून गेल्याची माहिती समोर आली.


अचानक दोघी पोलीस स्टेशनला आल्या अन्...


संजीवने यासंदर्भात पोलीस स्टेशनला पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसरीकडे वंदनाच्या वडिलांनी बिछवा पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. दोघांचेही नातेवाईक या दोघांचा शोध घेऊ लागले. अचानक 7 जुलै रोजी वंदना, खुशबू आणि वंदनाची 3 मुलं बिछवा पोलीस स्टेशनला पोहोचले. दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये त्या आपआपल्या मर्जीने घरातून पळून गेल्याचं सांगितलं. सध्या या दोघीही नोएडामधील सूरजपूर येथे राहतात. येथील एका खासगी कंपनीमध्ये या दोघी काम करतात आणि मुलांचं पालनपोषण करतात. 


नातेवाईकांबरोबर जाण्यास नकार


दोघीही पोलीस स्टेशनला आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मात्र खुशबू आणि वंदना या दोघींनीही आपल्या नातेवाईकांबरोबर घरी परतण्यास नकार दिली. खुशबूने पोलिसांसमोरच आपण पती संजीवबरोबर घरी जाणार नाही असं सांगितलं. तर दुसरीकडे वंदनाला घरी घेऊन जाण्यासाठी तिचा भाऊ पोलीस स्टेशनला आळा होता. मात्र तिनेही भावाचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार देत खुशबूबरोबरच आपण राहणार असल्याचं सांगितलं. 


पोलिसांनी त्यांना सोडून दिलं कारण...


आम्ही आता एकमेकींच्या झालो आहोत. आम्ही आता आयुष्यभर एकमेकींबरोबर राहणार आहोत, असं या दोघींनी आपल्या घरच्यांना सांगितलं आहे. पोलिसांनी या दोघींकडून त्या संमतीने एकत्र राहत असल्याचं लिहून घेतलं आणि त्यांना जाऊ दिलं. दोघीही सज्ञान असल्याने पोलिसांनी लिखीत माहिती घेऊन त्यांची मुक्तता केली.