मुंबई : Motolal Oswal Mutual Fund NFO: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने मोतीलाल ओसवाल S&P BSE Financials ex Bank 30 Index Fund लाँच करण्याची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही एक ओपन-एंडेड योजना आहे. या योजनेची सदस्यता 14 जुलैपासून सुरू झाली आहे.


आजपासून NFO होणार  सुरू


मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा नवीन फंड ऑफर (NFO) 14 जुलै 2022 रोजी उघडेल आणि 22 जुलै 2022 रोजी बंद होईल. हा अशा प्रकारचा पहिला निष्क्रिय फंड असेल, ज्याचा उद्देश बँका वगळून वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूकीला प्राधान्य देणे हा असणार आहे.


या निर्देशांकात S&P BSE 250 लार्ज मिडकॅप टोटल रिटर्न इंडेक्समधील टॉप 30 नॉन-बँकिंग वित्तीय स्टॉक समाविष्ट असतील. ज्याचे कमाल स्टॉक वेटेज 15 टक्के असेल. जून आणि डिसेंबरमध्ये निर्देशांक सहा महिन्यांनी रिबॅलन्स केला जाईल. निर्देशांकात गृहनिर्माण वित्त कंपन्या, एनबीएफसी, एक्सचेंजेस, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, विमा, कार्ड पेमेंट आणि फिनटेक यांच्या स्टॉकचा समावेश आहे.


किमान गुंतवणूक रु 500


म्युच्युअल फंड कंपनीच्या मते, एनएफओमध्ये गुंतवणूकदार किमान रु. 500 आणि त्यानंतर रु. 1 च्या पटीत गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूकदार आर्थिक सल्लागार किंवा कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून योजनेच्या युनिट्सची खरेदी आणि विक्री करू शकतात. या फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.