Badruddin Ajmal : खासदार काय बोलून गेले हे, `हिंदू लोक लग्नाआधी 2-3 बायका ठेवतात अन्...`
Badruddin Ajmal : आसाममधील एआईयूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल (Badruddin Ajmal ) यांनी हिंदूंविषयी (Hindu) मुक्ताफळं उधाळली आहेत.
MP Badruddin Ajmal : आसाममधील एआईयूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल (Badruddin Ajmal ) यांनी हिंदूंविषयी (Hindu) मुक्ताफळं उधाळली आहेत. हिंदू तरुण 40 व्या वर्षापर्यंत लग्न करत नाहीत, पण लग्नाआधी दोन ते तीन महिलांशी अवैध संबंध ठेवतात. मुलं होऊ देत नाही, मजा करतात, असा दावा अजमल यांनी केला आहे. 40व्या वर्षानंतर मुलं होण्याची क्षमता कमी होते, असं ते म्हणतात. त्यामुळे मुस्लिम युवकांप्रमाणे हिंदू तरूणांचं लग्न ( Hindu Marriage ) 20 ते 22 व्या वर्षी आणि तरूणींचं लग्न 18 व्या वर्षी करावं, असा सल्ला त्यांनी दिलाय.
'हिंदूंनी त्यांच्या मुलींचे लग्न 18-20 वर्षात केले पाहिजे'
अजमल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी लहान वयात मुलींचे लग्न लावून देण्याचे समर्थन केलेय. त्यांनी हिंदूंनी त्यांच्या मुलींचे लग्न 18-20 वर्षात केले पाहिजे आणि त्यांनी मुस्लिम फॉर्म्युला पाळला पाहिजे, फुकटचा सल्ला दिला आहे. आसाममधील करीमगंज येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेले अजमल म्हणाले की, कर्नाटक वक्फ बोर्डाने मुस्लिम मुलींसाठी 10 महाविद्यालये उघडणार असल्याचे सांगितले आहे. मी त्यांना आवाहन करेन की त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयांमध्ये हिंदू मुलींना प्रवेश द्यावा. आम्हाला सर्व मुलींना शिक्षण द्यायचे आहे.
Hindu लोक 40 वर्षाआधी दोन-तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. त्यांना मुलं होऊ देत नाहीत. मजा करतात. 40 वर्षानंतर ते कुठे अडकले तर ते लग्न करतात. पण 40 वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे राहते? मग कसं अपेक्षा ठेवता की मुलं वाढतील, असे धक्कादायक विधान त्यांनी केले.
भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
अजमल यांच्या हिंदू महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपने समाचार घेतला आहे. त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आसामचे भाजप आमदार डी कलिता म्हणाले की, तुम्ही मुस्लिम आहात आणि आम्ही हिंदू आहोत. आम्हाला तुमच्याकडून शिकायचे आहे का? ही भगवान राम आणि देवी सीता यांची भूमी आहे. येथे बांग्लादेशींना स्थान नाही. आम्हाला मुस्लिमांकडून शिकण्याची गरज नाही.