Crime News : देशात महिला, मुली आणि अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्यानंतर आता मध्य प्रदेशात मुक्या प्राण्यांनाही त्यांच्या वासनेचे शिकार बनवले जात आहे. आता शेळीवरही (goat) अत्याचार करण्यात आल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोरमध्ये शेळीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी (MP Police) सांगितले. नसरुल्लागंज पोलीस ठाण्याचे प्रभारी आकाश अमळकर यांनी सांगितले की, तक्रारीनंतर दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेरुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलकंठ गावात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. शेळीच्या मालकाने पोलिसांत याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तो शेळ्या चरत असताना त्याला एक शेळी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. शोधा शोध केली असता जवळच शेळीचा आवाज ऐकू आला. त्या दिशेने धाव घेतली असता आरोपी शेळीसोबत गैरकृत्य करताना दिसले.


तक्रारदाराने त्यानंतर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळताच दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 337, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एका वासरावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. 2 तरुणांनी एक महिन्याच्या बछड्यावर बलात्कार करून पळ काढला. वासराच्या मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंवि कलम 377, 34 आणि प्राणी क्रूरता कायद्यानुसार अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल केला होता. 8 मे रोजी हा सर्व प्रकार घडला होता.


घरात घुसून तरुणीवर अत्याचार


कल्याणमध्ये तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला अटक केली आहे. पीडिता घरात एकटीच राहत होती. याचाच गैरफायदा घेत हा तरुण घरात शिरला आणि तिच्यावर घरात अत्याचार केला. तरुणीवर बलात्कार केल्यानंकर नराधमाने तिला धमकावले होते.