नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि आपचे खासदार हरभजन सिंग यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. यामध्ये त्यांनी अफगाणिस्तानमधील शीख आणि गुरुद्वारांवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंग म्हणाले की, गुरुद्वारावरील या हल्ल्यांमुळे जगातील प्रत्येक शीखांच्या भावना दुखावल्या आहेत. आम्हाला टार्गेट का केले जात आहे. असे हल्ले आपल्याला अनेक प्रश्न विचारायला भाग पाडतात की हे हल्ले आपल्यावरच का होतात? आम्हाला का लक्ष्य केले जात आहे? हरभजनचे प्रश्न संपल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांचे कौतुक केले. यावर खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


हरभजन सिंग म्हणाले की, जगभरात कोविडच्या काळात गुरुद्वारांनी ऑक्सिजनपासून औषध आणि अन्नापर्यंत सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात शिखांचे शौर्य, कष्ट, धैर्य यासाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत आपल्या गुरुद्वारांवर होणारे हल्ले आपल्याला दुखावतात.'


काबूलमधील गुरुद्वारांवर हल्ले


हरभजन सिंग म्हणाले की, 18 जून रोजी काबूलमधील गुरुद्वारावर हल्ला झाला होता ज्यात दोन लोक ठार झाले होते आणि अनेक जखमी झाले होते. यापूर्वी 25 मार्च रोजी रायसाहेब गुरुद्वारावर हल्ला झाला होता, त्यानंतर दोन दिवसांनी त्याच गुरुद्वारावर पुन्हा हल्ला झाला. या हल्ल्यांमध्ये लोकांचा मृत्यूही झाला. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये दोन लाखांहून अधिक हिंदू आणि शीख लोक राहत होते, परंतु आता ही संख्या खूपच कमी झाली आहे.


हरभजन सिंग यांनी सभागृहात सांगितले की, अफगाणिस्तान हा एकेकाळी हजारो शिखांचा गड होता. अनेक दशकांच्या संघर्षामुळे ही संख्या काही मोजक्यांवर आली आहे. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये 2.20 हजार शीख आणि हिंदू राहत होते. 1990 च्या सुरुवातीला हा आकडा 15 हजारांवर आला होता आणि 2016 मध्ये तो 1350 वर आला आहे. ते म्हणाले की, आता तेथे फक्त 150 शीख उरले आहेत.



सभापतीकंडून कौतूक


यानंतर सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, हरभजन सिंग, तुम्ही चांगला मुद्दा मांडला. हरभजन सिंग हे प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्यांनी मांडलेला विषय महत्त्वाचा आहे. मला वाटते की परराष्ट्रमंत्री याकडे नक्कीच लक्ष देतील.