Kuno National Park : मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कूनो राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा (cheetah) मृत्यू झाला. नामिबियातून (Namibia) आणलेल्या या चित्त्याचं नाव सूरज (Suraj) असं होतं. कूनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत 5 चित्ते आणि 3 बछड्यांचा मृत्यू झाला आहे. सूरजच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आतापर्यंत आठ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. श्योपूर इथं असलेल्या कूनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) 26 जूनला सूरजला मोकळ्या जंगलात सोडण्यात आलं होतं. कूनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत दहा चीत्ते सोडण्यात आले आहेत. याआधी दोन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 'तेजस' या चित्त्याचा मृत्यू झाला होता. वन कर्मचाऱ्यांना तेजस जंगलात जखमी अवस्थेत आढळला होता. तेजसच्या मानेवर जखमा आढळल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस आणि सूरजमध्ये लढाई
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेजस आणि सूरजमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसक लढाई झााली होती. या लढाईत तेसजच्या मानेवर जखमी झाल्या होत्या , मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. तर या लढाईत सूरजही गंभीर जखमी झाला होता. त्याचा मृतदेह आता आढळून आला आहे. याशिवाय अग्नी नावाचा चित्ता जखमी आहे. त्याच्या पायाला फ्रँक्चर आहे. 


दक्षिण आफ्रिका-नामिबियातून चित्ते
दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून 20 चित्ते आणण्यात आले होते. पण वेगवेगळ्या कारणाने आतापर्यंत 5 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन बछड्यांचाही मृत्यू झाला. आात कूनो राष्ट्रीय उद्यानात 15 चीत्ते आणि 1 बछडा आहेत. यातल्या 12 चित्त्यांना कूनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं आहे. तर 4 चित्ते आणि एका बछड्याला पिंजऱ्यात ठेवलं गेलं आहे. 


कोणत्या चित्त्याचा कशामुळे मृत्यू
नामिबियातून आणणलेल्या मादी चित्ता ज्वालाने 4 बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी 3 बछड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 26 मार्च 2023 ला नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता साशाचा किडनी संग्रमणामुळे मृत्यू झाला. तर 23 एप्रिल 2023 मध्ये उदय नावाच्या चित्त्याची अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर 9 मे 2023 ला दक्षा नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. नर जित्त्यांबरोबर झालेल्या लढाईत दक्षाचा जीव गेला. त्यानंतर 11 जुलै 2023 ला दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तेजसनेही हिंसक लढाईत जीव गमावला. 


विरोधकांनी केली टीका
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चित्त्यांच्या मृत्यूवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. कूनो राष्ट्रीय उद्यानात आठ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. परदेशातून आणलेल्या चित्त्यांचा एकापाठोपाठ मृत्यू होत आहे, पण सरकारने याबाबत कोणतीही ठोस योजना राबलेली नाही. राजकीय कारणासाठी वन्य प्राण्याना शोभेची वस्तू बनवलं जात आहे.