लखनऊ :  एमपीएमएलए कोर्टाने (raj babbar mpmla court) यूपी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज बब्बर यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने राज बब्बरला 8 हजार 500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी राज बब्बरला दोषी ठरवण्यात आले आहे. गुरुवारी निकाल सुनावण्यात आला तेव्हा राज बब्बर न्यायालयात उपस्थित होते. 26 वर्षे जुन्या एका प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. (mp mla court sentences raj babbar to 2 years know exactly what is matter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बब्बर यांच्यावर 1996 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.  वजीरगंज येथील मतदान अधिकाऱ्याने 2 मे 1996 रोजी एफआयआर दाखल केला होता. तेव्हा बब्बर सपाचे उमेदवार  होते. त्यांनी बूथ क्रमांक 192 च्या मतदान अधिकाऱ्याला बनावट मतदानाचा आरोप करत मारहाण केली होती.


जामीन मिळण्याची आशा


ही शिक्षा 3 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना तुरुंगात पाठवलं जाणार नाही. बब्बर यांना जामीन मिळेल अशी आशा आहे. न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं बब्बर यांनी सांगितलं. बब्बर काँग्रेस सोडून पुन्हा समाजवादी पक्षात परतणार असल्याची चर्चा होती. बब्बर यांनी जनता दलातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.


डिंपल यादवचा पराभव 


बब्बर 5 वर्षे जनता दलात राहिले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 2006 मध्ये त्यांनी सपाशी संबंध तोडले आणि 2008 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फिरोजाबादमधून अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा पराभव केला होता.