सुट्टी नाही दिली म्हणून थेट राजीनामा आणि तो ही चक्क उपजिल्हाधिकारी पदाचा; `ति`ने कमालच केली
MP News : रजेवर असलेल्या छतरपूरच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धार्मिक कार्यक्रमाला जाऊ न दिल्याने संतापलेल्या निशा बांगरे यांनी हे पाऊल उचलले आहे. पत्र लिहून त्यांनी राजीनामा सरकारकडे सोपवला आहे.
MP News : मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. छतरपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे (Sub District Officer nisha bangre) यांनी आपला राजीनामा मध्य प्रदेश सरकारकडे (MP Government) सुपूर्द केला आहे. निशा बांगरे यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहित 25 जून रोजी बैतूल जिल्ह्यातील आमला येथे त्यांच्या घराचा गृहप्रवेश सोहळा होणार असल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे रजा मागितली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या रजेचा अर्ज नाकारली आहे. निशा बांगरे यांनी या पत्रात आपल्या वैयक्तिक आणि धार्मिक भावना दुखावल्या असून त्यामुळेच आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
निशा बांगरे या मध्य प्रदेशातील प्रसिद्ध अधिकारी आहेत. संविधानाला साक्षीदार मानून त्यांनी लग्न केले होते. यासोबतच निशा बांगरे निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा होती. त्यानंतर आता गृहप्रवेशासाठी सुट्टी न मिळाल्याने थेट राजीनामा दिल्याने निशा बांगरे या चर्चेत आल्या आहेत. निशा बांगरे सध्या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून तैनात आहेत. निशा बांगरे यांनी पत्र लिहून आपला राजीनामा मध्य प्रदेश सरकारकडे सोपवला आहे.
निशा बांगरे यांनी सांगितले की, "25 जून रोजी आमच्या घराचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी मी प्रशासनाला रजेसाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर मला सुट्टी देण्यात आली नाही. याशिवाय बेतूल जिल्ह्यातील सर्वधर्म शांती संमेलन आणि समभाव पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मी एक महिन्याची रजा मागितली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश परिषदेत थायलंडहून यायचा असल्याने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मला त्यात सहभागी व्हायचे होते पण मध्य प्रदेश सरकारने रजा नाकारली आणि त्यामुळेच मीअखेर राजीनामा दिला आहे."
दरम्यान, आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे निशा बांगरे यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. याच कारणामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे, असेही बांगरे यांनी सांगितलं आहे. निशा बांगरे सध्या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरमध्ये एसडीएम म्हणून तैनात आहेत. निशा बांगरे काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा त्या बैतूल जिल्ह्यातील अमला विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले होते.
निशा भांगरे यांनी 2010 ते 2014 दरम्यान विदिशाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत काम केले आणि 2016 मध्ये एमपीपीएससी परीक्षेत त्यांची डीएसपी म्हणून निवड झाली. 2017 मध्ये, एमपीपीएससीमध्ये त्यांची छतरपूर येथील उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली होती.