Girl Swallowed Mobile Phone : आतापर्यंत लहान मुले चुकीने एखादी वस्तू गिळतात हे तुम्ही वाचलं असेल. ते बाहेर काढण्यासाठी कधी घरगुती तर कधी वैद्यकीय उपचार करावे लागतात. पण मध्य प्रदेशात (MP News) एका मुलीने रागाच्या भरात चक्क मोबाईलचा (Mobile) गिळून टाकला आहे. भाऊ सोबत भांडण झाल्यानंतर या मुलीने मोबाईलच गिळून टाकला. हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांसह डॉक्टरांनाही (Doctor) धक्का बसला. तब्बल दीड तास शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी मुलीच्या शरीरातून हा मोबाईल बाहेर काढला अन् तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या इंदौरमधल्या भिंडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावा-बहिणीच्या भांडणात 18 वर्षाच्या बहिणीने किबोर्डवाला मोबाईलच गिळला. बहीण 18 वर्षांची आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर मुलीला ग्वाल्हेरच्या जयआरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरही हा प्रकार पाहून चक्रावून गेले. मुलीच्या पोटातील फोन सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली आणि मोबाईल बाहेर काढला. दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर आता मुलगी सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


मोबाईल गिळल्यानंतर मुलीला पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि तिला उलट्या होऊ लागल्या. मुलीची अवस्था पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला ग्वाल्हेरच्या जैरोग्य रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यावर तपासणी करुन डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुलीच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. मुलीच्या पोटातील फोन सुरक्षितपणे काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दोन तास अथक परिश्रम घेतले. 


या शस्त्रक्रियेनंतर मुलीला दहा टाके पडले आहेत. मात्र तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डॉक्टरांनी तसेच पालकांनी आपल्या पाल्याला अशी उपकरणे देण्यापूर्वी त्यांच्या  जबाबदारीचा विचार करावा असे आवाहन केले आहे.


बारीक केस कापले म्हणून मुलाची आत्महत्या


ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाने इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र आत्महत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेच्या दिवशी त्याचा मावस भाऊ त्याला केस कापायला सलूनमध्ये घेऊन गेला. पण सलूनवाल्याने त्याचे केस एकदम बारीक कापले. त्यामुळे मुलगा प्रचंड संतापला. त्याने घरी येऊन आदळाआपट सुरु केली. घरच्यांनी त्याची समजूत काढण्याता प्रयत्न केला. पण केस बारीक कापल्याचा राग त्याच्या मनात होता. रात्री जेवण झाल्यानंतर मुलगा आपल्या खोलीत गेला आणि बेडरुमच्या छोट्या खिडकीतून त्याने सोळाव्या मजल्यवरुन खाली उडी मारली. यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. भाईंदरमधल्या नवघर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.