श्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या
MP Shrikant Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले.
MP Shrikant Shinde: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणावरुन ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर कोर्ट सुनावणी अजुनही सुरु आहे. त्यावेळी दोघांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम केला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भर सभेत हनुमान चालीसा बोलून दाखवली होती. यानंतर आता संसदेत भाषण सुरु असताना अचानक खासदार श्रीकांत शिंदे हनुमान चालीसा बोलू लागले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. ते असं अचानक हनुमान चालीसा का म्हणाले? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले. एकेकाळी महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचण्यावर बंदी होती, असेही ते म्हणाले होते. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अचानक हनुमान चालीसाचे पठण का सुरू केले ते जाणून घेऊया.
संसदेतील अविश्वास ठरावादरम्यान श्रीकांत शिंदे बोलत होते. दरम्यान तुम्हाला हनुमान चालीसा माहित आहे का? असे एका महिला खासदाराने त्यांना विचारले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. ते सतत हनुमान चालिसाचे पठण करत होते. दरम्यान, त्यांना थांबवल्यावर शांत झाले.
श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल केला
संसदेत विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक भूमिकेत दिसून आले. पंतप्रधान मोदींनी 2018 मध्येच अविश्वास प्रस्तावाबाबत विधान केले होते. आता विरोधकही तेच करत आहेत असे ते म्हणाले. जेव्हा विरोधकांनी 2018 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हा 2019 मध्ये एनडीएचे अधिक खासदार निवडून आले.
श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्षांवर ताशेरे ओढले आणि म्हणाले की, 2014 मध्ये विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर 2019 मध्ये खासदारांची संख्या वाढली होती, यावेळीही विरोधकांनी अविश्वास ठराव आणला तर? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA चे अधिक सदस्य जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी
पंतप्रधान मोदींचे जोरदार कौतुक
आपल्या भाषणादरम्यान श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक केले. जनतेचा विश्वास मोदींवर असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींवर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, त्यांच्याकडे कोणताही नेता नाही आणि त्यांचा कोणताही हेतू नाही. श्रीकांत शिंदे यांनी विरोधी आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. या संघाला कर्णधार नाही आणि त्यांना विश्वचषक जिंकायचा आहे. ही विनाशाची युती आहे, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला.