मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. 'राजकीय दृष्टिकोन ठेवून एका समाजाला दाबण्याचे काम केले. मराठा समाजाचा किती दिवस अंत बघणार. मराठा समाजाच्या व्यथा आहेत की, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही. मराठा समाजाचा सोयी प्रमाणे विसर पडला.' असं उदयनराजे भोसले यांनी आज म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुढाकार राज्याने घ्यायचा होता. त्यावर भाष्य करणे गरजेचे होते. शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव शिकवण दिली. कळकळीची विंनती आहे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभेत जे मराठा आणि इतर समाजातील आमदार आणि खासदार आहेत यांनी हा आरक्षणाचा विषय सोडवण्याची गरज आहे.' असं उदयनराजे भोसले यांनी आवाहन केलं आहे.


निवडून दिलेल्या राजकीय लोकांना घरी बसवतील. सर्वोच्च न्यायालयाचा तारखेला महाराष्ट्राचा वकील हजर राहत नाही. त्यावर काही उत्तर नाही.
नाव घेऊन मी कोणाला मोठं करणार नाही. करायचे असेल तर हो म्हणा. कोरोनामुळे आता सगळे शांत आहेत. ऍक्शनला रिअॅकशन होणार. जातीचे राजकारण करणार असाल तर घरी बसा. वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.


'आताच्या सरकारने हा प्रश्न पुढे का नेला नाही. जबाबदार कोण आहेत याचा खुलासा झाला पाहिजे. मंडल आयोगाच्या वेळी संधी होती. संभाजीराजे ना मुख्यमंत्री करा. मी कार्यकर्ता बरा आहे.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


'देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या आरक्षण मिळेल. अनेक वेळा शरद पवारांशी बोलणे झाले. माझा कोणावरती रोख नाही, मराठा आरक्षण मिळाला पाहिजे. माझा कोणी शत्रू नाही, पवार साहेब असतील, आणखी कोणी असतील, ते वयाने मोठे आहेत.' असं देखील उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.