Mobile Blast : देशभर सध्या उन्हाची तीव्रता पहायला मिळत आहे. घराबाहेर पडणंही अवघड झालंय तर घरातही उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. उष्णतेचा परिणाम माणसांसोबतच मोबाईलवरही होऊ लागला आहे. त्यातच टाईट कपडे घालून खिशात मोबाईल ठेवत असाल तर थोडं सावध राहा, कारण अशीच एक घटना उज्जैनमध्ये घडली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्जैनचे रहिवासी निर्मल पमनानी हे गंगा फुटवेअरच्या नावाने दुकान चालवतात. शहरातील निजातपुरा इथं त्यांचं दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी ते त्यांच्या दुकानावर बसले होते. त्यांनी आपल्या जीन्सच्या पुढच्या खिशात मोबाइल ठेवलेला होता. पण तीव्र उन्हाच्या झळांमुळे खिशातला मोबाईलचा स्फोट झाला.


व्यापारी निर्मल आपल्या कामात दंग होते, पण त्याचवेळी उन्हामुळे मोबाईल प्रचंड गरम झाला. काही वेळाने खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि जीन्स पॅंटने पेट घेतली.  बाजूलाच बलेल्या लोकांनी तात्काळ आग विझवली, पण या घटनेत निर्मल यांची मांडी आणि हात चांगलाच भाजला.


निर्मल यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले तेथून त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ओव्हरचार्जिंगमुळे मोबाईल गरम होऊन स्फोट होतो तसंच सूर्यप्रकाशामुळेही मोबाईल गरम होतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.