नवी दिल्ली : भारताचा सगळ्यात यशस्वी क्रिकेटपटू एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी धोनीने निवृत्तीची घोषणा केली. आज ७ वाजून २९ मिनिटांपासून आपण निवृत्त झाल्याचं समजावं, अशी पोस्ट धोनीने इन्स्टाग्रामवर शेयर केली आहे. या पोस्टसोबत धोनीने त्याच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या क्षणांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीने मै पल दो पल का शायर हूं हे गाणंही टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्तीनंतर धोनी भविष्यात काय करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणं साहजिकच आहे. त्यातच आता धोनीने २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. 



'एमएस धोनी फक्त क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, इतर गोष्टींमधून नाही. क्रिकेटमध्ये त्याने केलेलं नेतृत्व आणि लढवय्येपणा त्याने सार्वजनिक जीवनातही दाखवला पाहिजे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक त्याने लढली पाहिजे,' असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.