मुंबई : एमटीएनएलने खूप दिवसानंतर युझर्सला नवीन दोन ब्रॉडबँड प्लान लाँच केले आहेत. ग्राहकांना या नव्या डेटा प्लानमध्ये 1 जीबीपीएस डाऊनलोडचा स्पीड मिळणार आहे. हा प्लान दिल्लीकरांसाठी असून मुंबईकरांकरताय या डेटा पॅकचा लाभ घेऊ शकतो. या प्लानची किंमत 2,990 आणि 4,990 रुपये असा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझर्सला दोन्ही प्लानमध्ये सहा महिन्यांकरता 4टीबी आणि 8 टीबी एफयूपी लिमिट देण्यात आली आहे. तसेच या सेवेचा फायदा नवीन युझर्स देखील घेऊ शकतात. एमटीएनएल सहा महिन्यानंतर ही लिमिट कमी करून अनुक्रमे 3 टीबी आणि 6 टीबी देणार आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. 


MTNL ब्रॉडबँड प्लान 


दिल्ली आणि मुंबईच्या ग्राहकांना दोन्ही ब्रॉडबँड प्लानमध्ये 1 जीबी डाउनलोडिंग स्पीड मिळणार आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देखील दिली जाणार आहे. बीएसएनएलदेखील लवकरच आपल्या ग्राहकांना नवीन ब्रॉडबँड प्लान दिले जाणार आहेत. 


कंपनीने सर्वाधिक युझर्सला आकर्षित करण्यासाठी या प्लानला बाजारात आणलं आहे. नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना 4000 जीबी आणि 8000 जीबी एफयूपी लिमिट मिळणार आहे. मात्र 6 महिन्यानंतर ही लिमिट कमी करण्यात येणार आहे. 


एमटीएनएलच्या या प्लानमुळे रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांना मोठी टक्कर दिली आहे. रिलायन्स जिओने गीगा फायबर अंतर्गत अनेक प्लान लाँच केला आहे. ज्यामध्ये 1 जीबी डाउनलोडींग स्पीड लवकरच मिळणार आहे. याची किंमत 8,4999 रुपये आहे.