Ambani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल
Gautam Adani : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली.
Mukesh Ambani Net Worth : 2022 या वर्षाला संपायला अवघ्ये दीड महिने राहिले आहेत. हे वर्ष प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अदानी समुहाचे (Adani Group) चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी लकी ठरलं आहे. कारण या दोन भारतीय उद्योगपतींचा तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. या दोघांनी जेवढी कमाई केली आहे. त्या मानाने इतर उद्योगपतींसाठी हे वर्ष खराब ठरलं आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे.
जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार रॉकेटच्या वेगाने कमाई करत गौतम अदानी यांनी यावर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे. अदानी समुहाच्या चेअरमनच्या संपत्तीत यावर्षी 56.4 अब्ज डॉलरची वाढ झाली असून ते 133 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये केवळ अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा समावेश आहे. (Mukesh Ambani and Gautam Adani Net Worth nmp)
हे वर्ष 'या' उद्योगपतीसाठी खराब
यावर्षी सर्वाधिक फटका एलोन मस्क यांना बसला आहे. संपत्ती गमावण्याच्या बाबतीत एलोन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. टेस्ला (Tesla) आणि SpaceX च्या CEO ची एकूण संपत्ती या वर्षात आतापर्यंत $89.7 बिलियनने घसरली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांची एकूण संपत्ती 335 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तर मेटा (फेसबुकची मूळ कंपनी) चे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) ज्यांची एकूण संपत्ती $82.9 बिलियनने कमी झाली आहे. अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या संपत्तीत यावर्षी 74.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे.