मुकेश अंबांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; `या` व्यक्तीला टाकले मागे
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची किंमत शुक्रवारच्या सत्रात विक्रमी स्तरावर पोहोचल्याने मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आशियाई व्यक्तीच्या अग्रस्थानी पोहोचले.
मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान मिळवलाय. त्यांनी अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांना अंबानी यांनी मागे टाकलंय. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची किंमत शुक्रवारच्या सत्रात विक्रमी स्तरावर पोहोचल्याने मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आशियाई व्यक्तीच्या अग्रस्थानी पोहोचले. जॅक मा यांच्याकडे ४४ अब्ज अमेरिकन डॉलर तर मुकेश अंबानी यांच्याकडे ४४.३ अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे.
मुकेश अंबानी यांनी याआधी सुद्धा चिनी उद्योगपतीवर मात केली आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये अंबानी यांनी हुई का यान या चिनी उद्योगपतीला श्रीमंतीमध्ये मागे टाकले होते. तेलापासून ते मोबाईलपर्यंत मुकेश अंबांनी यांच्या कंपन्यांचे साम्राज्य विस्तारलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.