Mukesh Ambani Business : व्यवसाय (business news ) क्षेत्रातील प्रत्येक विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुकेश अंबानी आणि त्यांच्या (Reliance Group Of Industries) रिलायन्स उद्योग समुहानं येत्या काळात एक मोठं यश संपादन करण्याचं स्वप्न पाहिलं आहे. अंबानींची रिलायन्स ही कंपनी येत्या काळात दिग्गज एंटरटेन्मेंट कंपनी (Walt Disney) वॉल्ट डिस्नेसह हातमिळवणी करणार असून, या मर्जरनंतर उदयास येणारी कंपनी ही मनोरंजन जगतातील सर्वात मोठी कंपनी ठरणार असून, या कंपनीची किंमत तब्बल 8.5 अब्ज रुपयांच्या घरात असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे या व्यावसायिक कराराची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मात्र देशात या करारामुळं नुकसानही होऊ शकतं कारण क्रिकेट ब्रॉडकास्ट राईट्समध्ये या कंपन्यांचा प्रचंड दबदबा असल्याचं सांगितलं जात आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार प्रस्तावित मर्जरसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने यांच्या एकत्रिकरणातून जी कंपनी नावारुपास येणार आहे त्या कंपनीकडे 120 टीव्ही चॅनल आणि दोन स्ट्रीमिंग सर्व्हिस असणार आहेत. यांची थेट स्पर्धा देशातील झी एंटरटेन्मेंट, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनशी असणार आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स आणि डिस्नेचा हा करार सीसीआयसाठी मोठी अडचण ठरणार आहे. कारण, या नव्यानं उदयास येणाऱ्याकंपरनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक रिलायन्सकडे राहणार असून, त्यांच्याकडेच टीव्ही आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर क्रिकेट प्रसारणासाठीचे अब्जो रुपये किमतीचे अधिकार असणार असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याचीही क्षमता असेल. याशिवाय जाहिरातदारही त्यांच्या मुठीत राहणार असून, याच कारणानं सध्या सीसीआय चिंतेत आहे. 


हेसुद्धा वाचा : 'ब्रिटनचे बिल गेट्स' बेपत्ता! Superyacht मध्ये असताना..; ₹ 8377 कोटींच्या मालकाचा शोध सुरु


 


सदर व्यवहार आणि करारासंदर्भात रिलायन्सकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार RIL आणि डिस्नेनं चॅनल कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले असून, फेब्रुवारी महिन्यामध्ये याविषयीची चौकशी प्रक्रियाही पार पडेल. सूत्रांचा हवाला देत रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्याची स्थिती पाहता भविष्यातील अडचणी दूर करण्यासाठी 10 किंवा त्याहून कमी टीव्ही चॅनलची विक्री कंपनी करू शकतात. पण, या दोन्ही कंपन्यांनी क्रिकेट प्रकरणात कोणतीही हयगय पाळण्यास नकास दिला असून, 2027 आणि 2028 मध्ये प्रसारण आणि प्रक्षेपणाचे अधिकार संपुष्टात येत असल्याची माहिती त्यांनी सीसीआयला दिली आहे. 


इथून पुढं रिलायन्स आणि डिस्नेकडे आयपीएलसह अनेक मोठ्या लीग सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही क्रिकेट अधिकार राहणार आहे. दरम्यान, मर्जरनंतर नव्यानं तयार होणाऱ्या कंपनीकडून लाईव्ह कार्यक्रमांदरम्यान जाहिरातदारांनाही दरवाढीचा सामना करावा लागू शकतो अशी चिंताही सध्या सीसीआयकडून व्यक्त केली जात आहे.