'ब्रिटनचे बिल गेट्स' बेपत्ता! Superyacht मध्ये असताना..; ₹ 8377 कोटींच्या मालकाचा शोध सुरु

Britain Bill Gates Superyacht Sank: एका तपासापासून सुरु असलेल्या खटल्याचा निकाल लागल्याच्या आनंदात आलिशान याचवर ठेवलेल्या पार्टीदरम्यान असं काही घडलं की संपूर्ण ब्रिटनमध्ये एकच खळबळ माजली आहे. जाणून घ्या ही व्यक्ती आहे तरी कोण आणि काय घडलं...

| Aug 21, 2024, 10:14 AM IST
1/11

Mike Lynch yacht

या घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून ही बातमी जागतिक स्तरावर चांगलीच चर्चेत आहे. नेमकं घडलंय काय आणि कसं जाणून घेऊयात सविस्तरपणे...

2/11

Mike Lynch yacht

'ब्रिटनचे बिल गेट्स' नावाने प्रसिद्ध असलेले उद्योजक माईक लिंच यांची लक्झरी याच (बोट) बुडाल्यापासून ते बेपत्ता आहेत. यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

3/11

Mike Lynch yacht

इटालीमधील सिसिली बेटाची राजधानी असलेल्या पालेर्मोजवळ माईक लिंच यांची याच बुडाल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी हा अपघात घडल्यापासून लिंच यांचा शोध सुरु असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. वादळ आल्याने ही बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे.

4/11

Mike Lynch yacht

59 वर्षीय माईक लिंच यांना सॅन फ्रॅन्सिस्कोमधील कोर्टाने फसवणूक प्रकरणामध्ये मोठा दिलासा देत जून महिन्यात निर्दोष मुक्तता केली होती. आपल्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून झालेल्या विक्रीसंदर्भातील व्यवहारामध्ये घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या विजयानंतर लिंच यांनी याचवर काही जवळच्या लोकांना विशेष पार्टी दिली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. 

5/11

Mike Lynch yacht

माईक लिंच यांच्याबरोबर या आलिशान बोटीवर त्यांची 18 वर्षांची मुलगी, मॉर्गन स्टॅनली या कंपनीचे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष जॉनथन ब्लूमर, वकील ख्रिस मार्व्हिलो आणि त्यांच्या पत्नीही होत्या. हे सर्वजण सोमवारपासून बेपत्ता आहेत. आता स्कुबा डायव्हर्सच्या मदतीनेही या सर्वांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

6/11

Mike Lynch yacht

माईक लिंच यांच्या या जलसमाधी मिळालेल्या याचचं नाव 'बायसीयन' असं आहे. या आलिशान बोटीला अपघात झाला तेव्हा त्यावर एकूण 22 जण होते. त्यापैकी 15 जणांना वाचवण्यात यश आलं असून यामध्ये लिंच यांची पत्नी अँजेला बॅकरसचाही समावेश आहे.  

7/11

Mike Lynch yacht

माईक लिंच यांचा जन्म 1965 साली केम्सफोर्ट या लंडनजवळच्या शहरात झाला. त्यांची आई नर्स तर वडील अग्निशामनदलामध्ये कार्यरत होते. माईक लिंच यांनी केंम्ब्रीज विद्यापिठातून फिजिक्स, गणित आणि बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी पीएचडी केली. 

8/11

Mike Lynch yacht

माईक लिंच यांनी 1996 साली युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी 'ऑटोनॉमी'ची स्थापना केली. पॅटर्न्ड अल्गोऱ्हीदमच्या माध्यमातून डेटा सर्च आि ऑर्गनाइज करण्याचं काम ही कंपनी करते. या कंपनीमुळेच त्यांना ब्रिटनचे बिल गेट्स असं नाव पडलं. ते त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. सुपरयाचबरोबरच अनेक महागड्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. 

9/11

Mike Lynch yacht

माईक लिंच यांनी 2001 साली 'ऑटोनॉमी' कंपनी एचपी या कंपनीला विकली. मात्र यामध्ये लिंच यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप एचपीने केला.

10/11

Mike Lynch yacht

सन 2012 पासून माईक लिंच आणि जगप्रसिद्ध कंप्युटर कंपनी एचपीमध्ये सुरु असलेला हा खटला तब्बल 12 वर्ष न्यायप्रविष्ठ होता. सदर न्यायालयीन लढा 2024 च्या जूनमध्ये संपला. न्यायालयाने लिंच यांना दोषमुक्त केलं. याचसंदर्भात त्यांनी याचवर पार्टी ठेवली होती. आता या बुडालेल्या याचचा शोध हेलिकॉप्टर आणि इतर बोटींच्या मदतीने घेतला जात आहे.

11/11

Mike Lynch yacht

फोर्ब्सच्या अब्जाधिशांच्या यादीमध्ये माईक मिंच यांनी 2014 मध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये त्यांची संपत्ती 1 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी होती. आजच्या घडीला ही रक्कम 8377 कोटी 80 लाख रुपये इतकी होते. मात्र 2016 मध्ये मिंच यांच्या संपत्तीत घट झाली.