Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) यांची ओळख आहे. बक्कळ कमाई करणारे अंबानी  चॅरिटीच्या माध्यमातून समाजसेवा करतात. यासाठी ते कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करतात. आता मात्र, अंबानी किती दिलदार आहेत ते देखील समोर आले आहे. अंबानी यांनी मैत्रीत असे काम केले की तुम्ही देखील म्हणाल मित्र असावा तर  अंबानी यांच्यासारखा. अंबानी यांनी आपल्या खास मित्राला 22 मजली इमारत गिफ्ट म्हणून दिली आहे. या मामत्तेची किंमत ऐकून कुणाचेही डोळे फिरतील.


अंबानी यांनी मित्राला दिले 1500 कोटींचे गिफ्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मित्र मनोज मोदी यांना अंबानी यांनी 1500 कोटींचे अलिशान घर गिफ्ट म्हणून दिले आहे. हे घर म्हणजे 22 मजली उत्तुंग इमारत आहे. मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश एरिया असलेल्या नेपियन्सी रोड येथे ही इमारत आहे. ‘वृंदावन’ असे या इमारतीचे नाव आहे. 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रात ही इमारत बांधली आहे. याचा दर 45,100 रुपये ते 70,600 रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. या इमारतीची किंमत 1500 कोटी इतकी आहे. एक वर्षांपूर्वी अंबानी यांना मोदींना ही इमारत भेट म्हणून दिली होती. या इमारतीमध्ये सात मजले केवळ पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. इमारतीत वापरण्यात आलेले फर्निचर इटलीहून इम्पोर्ट करण्या आले आहे. या इमारतीवर इन्फनाईट स्वीमिंग पूल देखील आहे. या इमारतीवरुन अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं. पार्टी रुम, फॉर्मल मीटिंग एरिया, स्पा, 50 प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेलं थिएटर अशा अनेक सुविधा देखील या इमारतीत आहेत. 


कोण आहे हा अंबानी यांचा खास मित्र?


मनोज मोदी असे या अंबानी यांच्या मित्राचे नाव आहे. अंबानी आणि मोदी दोघेही वर्गमित्र आहेत. दोघांनी विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून एकत्र शिक्षण घेतले आणि एकत्रच काम सुरु केले. रिलायन्सच इंडस्ट्रीजचा डोलारा उभा करण्यात मुकेश अंबानी यांना मनोज मोदींची मोठी साथ मिळाली. 1980 पासून मनोज मोदी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत काम करत आहेत. जिओ आणि रिटेल रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मनोज मोदी यांचे महत्वाचे योगदान आहे. 


रिलायन्सच इंडस्ट्रीजच नाही तर अंबानी कुटुंबासह घरगुती संबध


मनोज मोदी यांना फक्त रिलायन्सच इंडस्ट्रीज मध्येच नाही तर अंबानी यांच्या कुटुंबात देखील महत्वाचे स्थान आहे. त्यांचे  अंबानी कुटुंबासह घरगुती संबध आहेत. मनोज मोदी हे अंबानी यांचे निकटवर्तीय तसेच त्यांचा उजवा हात मानले जातात.