Google, Reliance ची हातमिळवणी, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
जाणून घ्या कोणत्या कारणासाठी ते एकत्र आले
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात RIL च्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 2जी मुक्तची घोषणा केली. सोबतच त्यांनी गुगल आणि रिलायन्स जिओनं हातमिळवणी केल्याची माहिती देत यांच्या संयुक्त विद्यमानं स्वस्तातील स्मार्टफोनही लॉन्च केला जाणार असल्याचं सांगितलं. ज्यामुळं देशातील सर्व 2जी फिचर फोन वापरणाऱ्यांना स्मार्टफोन वापरण्याची संधी मिळणार आहे.
गुगलनं भारतात ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं जाहीर केल्याच्या अवघ्या काही दिवसांतच रिलायन्सशी हातमिळवणी झाल्याची मोठी माहिती समोर आली. वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या कंपनीकडून 5जी नेटवर्क तयार करण्यात आल्याची मोठी घोषणाही करण्यात आली. शिवाय हे जगातील सर्वोत्तम 5जी नेटवर्क असल्याची हमीही त्यांनी दिली.
JIO जिओतर्फे करण्यात आलेल्दाय दाव्यानुसार हे नेटवर्क तयार करण्यासाठी देशातील जवळपास २०हून अधिक स्टार्टअपची मदत घेण्यात आली आहे. जिओच्या या नव्या टप्प्याची माहिती देत असताना त्यांनी गुगलकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. गुगलनं जिओमध्ये तब्बल ३३७३७ रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यामुळं या गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडे कंपनीची ७.७ टक्के भागीदारी मिळेल.
भारतात करण्यात आलल्या या गुंतवणुकीबाबत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनीही आपलं मत मांडलं. एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रिलायन्ससोबतच्या आपल्या पहिल्या गुंतवणुकीबद्दल कमालीचा अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सर्वांनाच इंटवरनेटच्या सुविधेची उपलब्ता असावी. त्याच धर्तीवर भारतात डिजिटायझेशन फंडमध्ये आपण योगदान दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या या सभेमध्ये अंबानी यांनी जिओ ग्लासचीही घोषणा केली. हे एक मिक्स्ड रिऍलिटी ग्लास असून, त्यात इंटरनेट, स्पीकर आणि माईक अशा सुविधा असतील. तर या माध्यमातून तुम्हाला फोनही लावला येऊ शकतो.