Mukesh Ambani यांनी दुबईत खेरदी केलं सर्वांत महागड घर, किंमत ऐकूण धक्का बसेल
10 बेडरूम, खाजगी स्पा आणि दोन स्विमिंग पुल...इतकं आलिशान आहे अनंत अंबानीचं दुबईतलं घर, किंमत माहितीय का?
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देशातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. या श्रीमंत व्यक्तीने आता दुबईत आपली प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मुलगा अनंत अंबानीसाठी (Anant Ambani) त्यांनी हे घर खरेदी केल्याची माहिती आहे. त्यामुळे इतक्या आलिशान असलेल्या या घराची किंमती आहे तरी किती? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे जाणून घेऊय़ात या घराची किंमत?
घरात 'या' आलिशान सुविधा
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दुबईत सर्वात महागडं घर खरेदी केले आहे. मुलगा अनंत अंबानीसाठी त्याने हे घर खरेदी केले आहे. अनंत अंबानीचं हे महागड घर बीच-साइड व्हिला पाम-आकाराच्या (कृत्रिम बेट) उत्तरेकडील भागात स्थित आहे. या घरात 10 बेडरूम, एक खाजगी स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर पूल आहेत.
शाहरूखचा होणार शेजारी
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी विकत घेतलेल्या घराजवळ प्रसिद्ध ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांचे व्हिला आहेत. हा बीच-साइड व्हिला पाम-आकाराच्या (कृत्रिम बेट) उत्तरेकडील भागात स्थित आहे. त्यामुळे आता अनंत अंबानी आता डेव्हिड बेकहॅम आणि शाहरुख खानचा शेजारी होणार आहे.
दुबईत घर खरेदीचं 'हे' खास कारण
अलिकडच्या काळात दुबई हे अतिश्रीमंत लोकांसाठी आवडते ठिकाण बनले आहे. ज्या श्रीमंत लोकांना घर खरेदी करायचे आहेत, ते दुबईत घर खरेदी करतायत. खरं तर दुबई सरकारने ‘गोल्डन व्हिसा’ आणि परदेशी नागरिकांसाठी घर मालकीबाबतचे नियम शिथिल करणे हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे.
किंमत किती?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दुबईत सर्वात महागडं घर खरेदी केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेला हा करार मुकेश अंबानी यांनी पूर्णपणे गुप्त ठेवला होता. मात्र या खरेदीशी संबंधित माहितीच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घर खरेदीचा हा करार $80 दशलक्ष म्हणजे भारतीय चलनात सुमारे 640 कोटी रुपयांना झाला आहे.
दरम्यान अनंत अंबानी (Anant Ambani) याच्या आधी अंबानी यांनी मागील वर्षीच्या सुरुवातीला, ब्रिटनमधील जॉर्जियन काळातील एक वाडा रिलायन्सने $79 दशलक्षला विकत घेतला होता. हा वाडा मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीसाठी विकत घेतला होता.