मुंबई :Mukesh Ambani Succession Plan :  साधारण 20 वर्षांपासून देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची कमान सध्या मुकेश अंबानी सांभाळत आहेत. लवकरच ते निवृत्ती घेणार आहेत. देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनीच हे संकेत दिले आहेत. येणाऱ्या काळात रिलायंस इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात मोठे बदल होणार आहेत. 


पहिल्यांदा निवृत्तीबाबत बोलले मुकेश अंबानी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायंस इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. ते म्हटले की, नवीन पिढी नेतृत्वाची जबाबदारी पेलण्यास तयार आहे.


आपल्याला त्यांना मार्गदर्शन करावे लागेल. त्यांना सक्षम बनवायला हवे. तसेच त्यांचा उत्साह वाढवायला हवा. आपल्याला आरामात बसून नवीन पिढीला आपल्यापेक्षा जास्त चांगली प्रगती करताना पाहायचंय. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.


संपत्तीच्या विभाजनावर बनवण्यात येतेय योजना


यावर्षी प्रथमच ऑगस्टमध्ये मुकेश अंबानी निवृत्तीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. रिलायंस उद्योग समुह भारतातील तसेच आशियातील बलाढ्य उद्योग समुह आहे. या


उद्योग समुहाचे कशापद्धतीने विभाजन करण्यात यावे याबाबत नियोजन सुरू आहे. हे काउंसिलला ठरवायचे आहे की, प्रत्येकाला योग्य जबाबदारी आणि प्रतिनिधित्व मिळावे. दरम्यान, रिलायंस उद्योग समुहाने या वृत्ताचं खंडन केले आहे. 


धीरूभाई यांच्या निधनानंतर संपत्ती विभाजनाचा मोठा वाद


मुकेश अंबानी आपल्या वडिलांच्या निधनानंतर म्हणजेच 2002 पासून रिलायंस इंडस्ट्रीजचे नेतृत्व सांभाळत आहेत. मुकेश अंबानी रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन झाल्यानंतर त्यांचे मोठे बंधू अनिल अंबानी यांच्यासोबत मोठा संपत्तीचा वाद उभा राहिला होता. याबाबत सार्वजनिक रित्या वक्तव्य देखील झाले होते.


त्यामुळे मुकेश अंबानी आता नवीन पिढीकडे जबाबदाऱ्या सोपवून अशा प्रकारच्या वादाची कोणतीही शक्यता ठेवू इच्छित नाही.