श्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी
इतकं वाईट घडलेलं असतानाही त्या सावरण्याचा प्रयत्न करत होत्या...
Nita Ambani : आज जितकी प्रसिद्धी मुकेश अंबानी (Mukesh ambani ) यांना आहे, तितकीच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही. जागतिक उद्योग क्षेत्रात नावाजलेल्या अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यानं त्यांच्या परीनं उल्लेखनीय कामगिरी निभावत कुटुंबाला साजेशी कामगिरी केली आहे. (Nita Ambani) नीता अंबानी हे त्यातलंच एक नाव. मुकेश अंबानी यांची पत्नी असण्यासोबतच नीता यांनीही त्यांची वेगळी ओळख तयार केली. श्रीमंती, प्रसिद्धी आणि आपल्या माणसांचं प्रेम त्यांना ओघाओघानं मिळतच होतं. पण त्यासोबतच जीवनाच्या या प्रवासात एक असंही वळण आलं, ज्यामुळं नाही म्हटलं तरी नीता अंबानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना मातृत्त्वाचं सुख अनुभवता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आपण आई होऊ शकत नाही, हे कळालं तो क्षण नीता अंबानी यांना हादरवणारा होता. कोणत्याही महिलेसाठी ही बातमी कोलमडून टाकणारी.
तिथे नीता अंबानी या आघातातून सावरत होत्या. तेव्हाच एक आशेचा किरण दिसला. हा तोच आशेचा किरण होता, ज्यामुळं अंबानी कुटुंबातं नशीब पालटलं. दिवस सरत होते, मैत्रीण डॉ. फिरुजा पारिख यांच्या मार्गदर्शनानं नीता यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आणि पहिल्यांदाच त्यांनी दोन जुळ्या मुलांना त्यांनी जन्म दिला. (Pregnancy) प्रसूतकाळाआधीच त्यांनी मुलांना जन्म दिला होता.
अधिक वाचा : Nita Ambani : नीता अंबानी साडी नेसविण्यासाठी देते 1 लाख रुपये, कोण आहे 'ही' महिला?
नीता अंबानी यांची गर्भधारणा आयवीएफ (IVF) च्या मदतीनं झाली होती. अंबानींची लेक, ईशा (Isha ambani) हिनं एका मुलाखतीत आपला आणि आपल्या जुळ्या भावाचा म्हणजेच आकाश अंबानीचा (Akash Ambani) जन्म IVF पद्धतीनं झाल्याचं सांगितलं होतं.
ईशा आणि आकाशच्या जन्मानंतर अंबानी कुटुंबाचं गोकुळ झालं. पुढे अनंत अंबानीचा (Anant Ambani) जन्म झाला. तिन्ही मुलांच्या नीता यांनी संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला होता. मुलांच्या संगोपनाला वेळ दिल्यानंतर पुढे ती मोठी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कामात लक्ष देण्यास सुरुवात केली.
नकारात्मक गोष्टींचा आघात नीता अंबानी यांच्यावर झाला होता. पण, यातूनही त्या सावरल्या. तंत्रज्ञान, विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यांना मदतीचा हात मिळाला. नशिबाची साथही मिळाली. आज असंख्य अशा महिला आहेत, ज्यांना नैसर्गितरित्या गर्भधारणेत असंख्य अडचणी येतात. त्यांच्यासाठी IVF हा पर्याय कोणा एका वरदानाहून कमी नाही.