Unbelievable! `या` अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स उद्योग समुहाची उडी
कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे.
Reliance News : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स उद्योग समुहानं अविश्वसनीय उसळी मारली (Reliance Industries Ltd). गेल्या काही वर्षांमध्ये शक्य आणि उपलब्ध असणाऱ्या बहुतांश क्षेत्रांमध्ये या समुहानं नव्यानं सहभगा घेतला आणि समर्पकपणे काम करत या क्षेत्रांत उल्लेखनीय उंची गाठली. आता त्यातच आणखी एका क्षेत्राची भर पडताना दिसणार आहे. कारण कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे.
हे अनपेक्षित क्षेत्र आहे सलून व्यवसाय (salon business). विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स समूहातील रिटेल ग्रुप सध्या Naturals Salon & Spa ची पॅरेंट कंपनी असणाऱ्या ग्रूम इंडिया सलून अँड स्पा (groom india salon & spa) ची 49 टक्के भागिदारी खरेदी करण्याच्या तयारीत दिसत आहे.
Naturals Salon चे देशात 700 आऊटलेट्स
Naturals Salon चे भारतामध्ये 700 आऊटलेट्स आहेत. रिलायन्स ही संख्या तिपटीहून जास्त फरकानं वाढवू इच्छिते. थोडक्यात 3000 आऊटलेट्सचं लक्ष्य समुहानं डोळ्यांपुढे ठेवलं आहे. कोविड काळात Naturals Salon ला 20 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यातून सावरण्यासाठी रिलायन्सची साथ हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
वाचा : श्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी
पहिल्या टप्प्यात व्यवहार
Naturals Salon & Spa चे कार्यकारी अध्यक्ष (CEO) सीके कुमारावेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या व्यवहारासंबंधीची सर्व बोलणी प्राथमिक स्तरावर आहे. पण, रिलायन्सकडून मात्र या संपूर्ण प्रकरणी अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, हा व्यवहार निकाली निघाल्यास रिलायन्स समूहाची सलून क्षेत्रातील एंट्री या क्षेत्रालाच नवी कलाटणी देऊ शकते यात वाद नाही.