Crime News: म्हातारवयात मुलं हाच वयस्क मातापित्याचा आधार असतात. मात्र, बऱ्याच पोटची मुलं संपत्तीसाठी आई-बापाला वाऱ्यावर सोडून देतात. त्यांचा छळ करतात. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) या पेक्षा भयानक प्रकार घडला. दोन मुलींने आपल्या पित्यासह केलेले कृत्य पाहून तुम्हालाही संताप येईल. अशा मुला कोणाच्याही पोटाला जन्माला येऊ नयेत असेच उद्गाक तोंडातून निघतील. मुलींच्या कृत्यामुळे एक हतबल पित्याची 14 वर्षापासून स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपड सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे संपूर्ण प्रकरण बाराबंकी जिल्ह्यातील (barabanki) सिरौलीघौसपूर तहसील भागातील तुर्कानी गावातील आहे. सत्यनारायण असं या पित्याचं नाव आहे. प्रीती आणि ज्योती सैनी या सत्यनारायण यांच्या दोन मुलींनी त्यांना जिवंतपणीच मृत घोषित केलं आहे. 


12 ऑक्टोबर 2005 रोजी सत्यनारायण यांच्या पत्नी सरोज कुमारी (Saroj Kumari) यांचं निधन झालं होतं. यानंतर आई वडिलांची संपत्ती मिळण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलींनी सत्यनारायण यांना कागदोपत्री मृत (Dead On Paper) घोषित केलं.


आणखी वाचा - Raju Theth: एक दोन नव्हे तर 10 वर्षाची प्लॅनिंग, लॉरेन्स गँगने असा रचला कट; घटनेचा Video समोर!


प्रीती आणि ज्योती यांनी त्यांना त्यांच्या आईसह कुटुंब रजिस्टरच्या प्रतीमध्ये वडिलांना देखील मृत दाखवलं आहे. या मृत्यू पत्राच्या आधारे दोघींनी वारसा हक्काने (inheritance rights) आई-वडिलांच्या संपत्तीवर हक्क दाखवला आहे. सत्यनारायण तहसीलदाराकडे तक्रार केली आहे. स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सत्यनारायण मागील 17 वर्षांपासून लढा देत आहेत.